पार्डी(देवी) येथील हनुमान भक्तांनी ओढल्या पाच बैलगाड्या.
भाविक-भक्तांच्या गर्दीत कार्यक्रम पार.
१०० वर्षापासूनची गाडे ओढण्याची परंपरा आजही पार्डी येथे कायम.
उत्तम ब्राम्हणवाडे
अंजनगाव बारी पासून असलेल्या पार्डी (देवी) येथील शेंवडे कुटुंबातील वंशपरंपरेने गाड्या ओढण्याचा परंपरा हनुमान महोत्सवादिनी पार्डी येथे पार पडली.कुटुंबातील हरिचंद्र शेवंडे यांनी यांनी हनुमान मंदिरापासून पाच बैलबंड्या ओढल्या यावेळी पार्डीसह इतर आजूबाजूच्या गावातील असंख्य नागरिक हा अभुतपुर्व सोहळा पाहण्याकरीता उपस्थित होते.नागरिकांसह भक्तांनी मोठी गर्दी या कार्यक्रमानिमित्त केली.शेंवडे यांची गावातील विधीवत पुजा काढून थेट हनुमान मंदिरापासून आपल्या असिम अद्भभुत शक्तीचे अनोखे प्रदर्शन या हनुमान भक्तांने दाखवले.यावेळी गावात एकप्रकारे धार्मिक उत्सावाचे स्वरुप आले होते.१०० वर्षापासून चालत आलेली ही परंपरा एकाच कुटुंबातील तिसरी पिढी भुषवत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात दुरवरून भक्तगण आपली हजेरी दरवर्षी लावताततसेच आजच्या दिवशीच पार्डी येथील गंगा-जमुना, गोसाई,मरामाय या तिन्ही मातेच्या मिरवणूका गावातून मोठ्या उत्साहात मोठ्या भक्तीभावाने व श्रद्धेने पुर्ण गावात या मिरवणूक प्रदक्षिणा घालतात.यानंतर गावातील एका ठिकाणी दहिहंडी फोडण्यात आली. सर्वत्र आजपासून पोर्णिमेच्या दिवसेपर्यँत चालणाऱ्या या चैत्र नवरात्राचा शेवटला दिवस असुन देवी भक्तांच्या मनोकामना पुर्ण करते अशी नागरिकांची श्रद्धा आहे.
Comments