शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान.
मुसळधार ,संततधार पावसामुळे नाल्यांना पुर,शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे सर्वत्र नुकसान.
उत्तम ब्राम्हणवाडे .
दि.२९ एप्रिल रोजी दुपारनंतर झालेल्या मुसळघार पावसामुळे अंजनगाव बारीतील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन अंजनगाव बारी- पार्डी रोडवरील तेलाई माता पुल वाहून गेल्याने पुलाच्या वरून पाणी दुथडी भरून वाहत असुन निदानजी महाराज रेल्वे पुलाला पुर आल्याने परिसरातील गैबिशहा तलाव व कोंडेश्वर तलावातही पाण्याचा विसर्ग वाहत आहे.
अंजनगाव बारी येथे झालेल्या विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे येथील शेतकरी प्रकाश दातीर व परिसरातील कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जवळपास ९० टक्के कांद्याचे पिक नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.मुसळधार झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शिवारात बांधारे फुटल्याने पिकांना पाणी देणारे बांधाऱ्याचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्वत्र झालेल्या नुकसानीची पाहणी करून योग्य ती आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांना संबंधित कृषी विभागाना केली आहे.
वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोलर पँनलचे नुकसान
Comments