महिला पोलिसाच्या विश्रामगृहाचे उद्घाटन संपन्न.
ठाणेदार विशाल पोळकर यांचा स्तुत्यपुर्न उपक्रम.
उत्तम ब्राम्हणवाडे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळावी याकरिता नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल पोळकर यांच्या अभिनव संकल्पनेतून पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये महिला विश्रांतीगृह तयार करण्यात आले असून दिवसभर आपला आपले कर्तव्य बजावून महिला कर्मचाऱ्यांना आराम मिळावा याकरिता या विश्रामगृहाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती येथील ठाणेदार विशाल पोळकर यांनी दिली. महाराष्ट्र दिनाच्या औचित त्यावर या विश्रामगृहाचे उद्घाटन धामणगाव रेल्वे येथील विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार प्रताप अडसड यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. या परिसरामध्ये लवकरच सुसज्ज असे महिला विश्रामगृह करिता आपण निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. तसेच ही अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल नांदगाव खंडेश्वर चे ठाणेदार विशाल पोळकर यांचे अभिनंदन सुद्धा आ.अडसड यांनी केले.या कार्यक्रमाला भाजपाचे प्रशांत वैद्य, शिवसेनेचे पुरुषोत्तम बनसोड, माया देशमुख, यांचेसह प्रमोद पिंजरकर नवलचंद खिची,विलास वितोंडे, निकेत ठाकरे,ऋषिकेश ढेपे, अरुण लाहब्रर,अमोल मारटकर,रणजीत खंडाळकर, आशिष रावेकर,अविनाश ब्राह्मणवाडे, यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी एस आय सुनील मोरे,एस आय एस.आय.कुरळकर,पो.हे.का. प्रफुल शहारे,पो.हे.का राजेश हिरेकर,पो.हे.का गणेश खंडारे, पो.हे.का.अमर वसंतकर,ना.पो.का. सतीश राठोड,ना.पो.का. सतीश गावंडे, ना.पो.का.ठवकर,ना.पो.का. ललित केळकर,ना.पो.का. प्रशांत पोकळे,पो.का.चंद्रकांत केंद्रे, पो.का.गोपाल शेंडे,महिला पोलीस कर्मचारी प्रतीक्षा राठोड, अर्चना पाटील, रश्मी ठाकरे,माधुरी सराटे,उषा तायडे, यावेळी उपस्थित होते.
Comments