डॉ.गजानन मेश्राम यांचा उत्कृष्ट पशुवैद्यक म्हणून सन्मान.

नागपूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाला सत्कार.

सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन.

उत्तम ब्राम्हणवाडे.

20 मे हा दिवस महाराष्ट्र राज्यात पशुसंवर्धन विभागाचा स्थापन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधून नांदगाव खंडेश्वर येथील पशुसंवर्धन दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम यांचा उत्कृष्ठ पशुवैद्यक म्हणून नागपूर येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या वेळी अमरावती व नागपूर विभागतील प्रादेशिक पशु संवर्धन सहआयुक्त डॉ सतीश राजू, डॉ राजीव खेरडे,जिल्हा पशु संवर्धन उपआयुक्त डॉ पुरुषोत्तम सोळंके,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तसेच अमरावती व नागपूर विभागतील सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहाय्यक आयुक्त, गुणवंत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांस विशेष निमंत्रित डॉ गुप्ता राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद,(गुजरात)डॉ.बलदेव रामटेके, निबंधक, महाराष्ट्र पशु वैदकपरिषद नागपूर, महाराष्ट्र पशु व मत्स विद्यापीठ नागपूर येथील प्राधापकसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ गजानन मेश्राम हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असून तालुक्यातील नागरिकांना आपुलकीची वागणूक देणारे अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत.त्यांच्या या सन्माना बध्ध्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात