नांदगाव खंडेश्वर तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन जोरात.

महसूल आणि पोलीस प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग. तलाठ्यांच्या समोर होते रेतीची चोरी;पण कार्येवाही शून्य. उत्तम ब्राम्हणवाडे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वच नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या आणि रात्रीला सुद्धा महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून खुलेआंम पने अवैध रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हा सर्व प्रकार तलाठ्यांच्या डोळ्यासमोर होत असून कोणत्याही रेती तस्कर यांचेवर कार्येवाही होत नसल्याने दोन्ही प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथील बेंबळा नदीच्या पात्रातून रात्रभर चोरटे हे रेतीची चोरी करुन रेती विकण्याचे काम करीत असून यामध्ये काही ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून हा सर्व प्रकार तेथील तलाठ्यांना माहिती असूनही त्यांच्याकडून कुणावरही कार्यवाही होत नसल्याचा आरोप फुबगाव येथील नागरिकांनी लावला आहे आणि याचा त्रास मात्र या नदीपात्रा जवळ असलेल्या शेतकऱ्यांना होत आहे शेतकऱ्याच्या शेतातून रेतीची चोरी करणारे आपली वाहने नेत असून शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.याबाबत नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार आणि ठाणेदार यांना गावातील काही नागरिकांनी सूचना दिल्यावरही त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कार्येवाही करण्यात येत नसल्याचा आरोप फुबगाव येथील नागरिकांनी लावला आहे.
त्याचप्रमाणे जावरा (मोळवण),धानोरा (गुरव), शिवणी(रसुलापुर),मंगरूळ (चव्हाळा) धामक आणि इतरही नदीच्या पात्रातून दिवसाढवळ्या आणि रात्रीला सुद्धा रेतीची चोरी खुलेआंम पने संपूर्ण नांदगाव तालुक्यातून होत असून प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही या चोरट्यावर करण्यात येत नसल्याने या चोरट्यांचे मनोबल चागलच वाढले असून कोणताही महसूल न भरता हे चोरटे जादा भावाने नागरिकांना रेतीची विक्री करून चागळेच गब्बर झाले आहेत. रात्रीला या चोरट्यांचा चागलाच उच्छाद पाहायला मिळते. याच्यावर कुणाचाही वचक नसल्याने हे चोरटे चाग्लेच निर्धावले आहेत.त्यामुळे याच्यावर कडक कार्यवाही होणे महत्वाचे असून प्रशासन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने प्रशासनातील अधिकारी यांचे कदाचित हात तर ओले होत नसेल ना ? असा प्रश्न नागरिक आता उपस्थित करू लागले आहेत.
या अवैध रेती चोरीमुळे नद्यांचे पात्र हे कोरडे होत असून काही ठिकाणी नदीचे अडविलेले पाणीसुद्धा हे चोरटे सोडून देत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे शासनाचा करोडोचा महसूल बुडत असून चोरटे आणि अधिकारी हे गब्बर होत आहे त्यामुळे या चोरट्यावर योग्य ती कार्यवाही करून यावर प्रतिबंध लावावा आणि याकडे खुद्द जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकरी यांनीच लक्ष देण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. ............................................. स्टेटमेंट ............................................. जावरा(मोळवन) येथील नदीवरून रेतीची दिवसरात्र खुलेआम चोरी करण्यात येते याबाबत मी स्वतः तहसीलदार आणि ठाणेदार यांना अनेकदा फोन करून सूचना दिली परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही उलट रेती चोरणाऱ्यांनाच कुणी तक्रार केली याची माहिती दिली जाते आणि जेव्हा चोरटे रेती घेऊन गेलेले असतात तेव्हा प्रशासनातील अधिकारी मोका स्थळी पोहोचलेले असतात त्यामुळे ते कारवाई तरी कुणावर करणार ? रेती चोरट्यांना अधिकारी नदीवर येणार हे कसे माहीत होते.आणि अधिकारी येण्यापूर्वीच ते पसार सुद्धा झालेले असतात त्यानंतर ह्याच रेती चोरट्यांकडून तक्रारकर्त्याना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात हा सर्व प्रकार माझ्या सोबत घडलेला आहे.आणि हा प्रकार संपूर्ण तालुक्यामध्ये सर्रास सुरू आहे. उमेश दहातोंडे सरपंच,ग्राम पंचायत,खंडाळा(खुर्द ) ...........................................
.... तालुक्यात रेती चोरीच्या वाढत्या घटनेसंदर्भात आम्ही भरारी पथके तयार केली आहेत. आणि ती पथके प्रत्यक्ष रेती घाटावर जाऊन पाहणी करीत आहेत कुणाची तक्रार आमच्याकडे आल्यास अथवा प्रत्यक्ष पाहणी दरम्यान रेती चोर आढळल्यास त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश मी भरारी पथकांना दिलेले आहेत.त्यानुसार संपूर्ण तालुक्यामध्ये रेती चोरावर कार्यवाही करण्यात येत आहे. पुरुषोत्तम भुसारी तहसीलदार,नांदगाव खंडेश्वर

Comments

Anonymous said…
रेतीमाफिया आवाज उठवणे गरजेचेच होते खूप खुप शुभेच्छा!💐💐

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात