नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतच्या घंटागाड्यांचे लोकार्पण.

आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती.

नागरि कचरा व्यवस्थापन अंतर्गत शहराला मिळाल्या चार घंटागाड्या.

उत्तम ब्राम्हणवाडे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने शहरातील घनकचरा संकलन करन्यासाठी चार नवीन गाड्यांचे लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने नगरपंचायतीच्या वतीने धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आले.
या गाड्यांच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना आ. प्रताप अडसड म्हणाले की, नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या विकासाकरिता आपण कटिबद्ध असून शहराच्या विकासाकरिता नगरपंचायतीला सर्वपरी सहकार्य करणार आहोत असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी नगरपंचायतीच्या वतीने आमदार प्रताप अडसड यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रशांत वैद्य,प्रमोद पिंजरकर,नवलचद खिची, विलास वितींडे,निकेत ठाकरे, ऋषिकेश ढेपे, पुरुषोत्तम बनसोड,अमोल मारोटकर,रणजित खंडाळकर, अविनाश ब्राम्हणवाडे,माया देशमुख,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक अरुण लाहबर प्रास्ताविक संजय चौधरकर,तर आभार प्रदर्शन अभिजित लोखंडे यांनी केले.
या कार्यक्रमाला मंगेश मानके,आशिष रावेकर,पंकज पिंजरकर ,योगेश खंडार, यांचेसह नगर पंचायत कार्यालय अधीक्षक नम्रता देशपांडे,पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता अभिजीत लोखंडे, लेखापाल स्वप्निल बनसोड,शहर समन्वयक नेमिनाथ सानप,लिपिक संजय चौधरकर,आशिष ढवळे, राहुल सावळे, माधुरी खरे व इतर कर्मचारी वर्ग. यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात