आदर्श विद्यार्थी घडविण्याकरिता बाल संस्कार शिबिर हे मोलाचे ठरेल.
ह भ प विशाल महाराज बडे यांचे प्रतिपादन.
बाल संस्कार शिबिराचे थाटात समारोप साजरा.
आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती.
उत्तम ब्राम्हणवाडे.
सध्याच्या परिस्थितीत मोबाईल टीव्ही मोबाईलवर उपलब्ध होणारे चित्रपट असेल नसेल त्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याने लहान वयातील मुलांपासून तर तरुण वर्ग मोबाईलच्या आहारी गेला आहे या कारणामुळे आपल्याला विसर पडत चालला हरिपाठ,ज्ञानेश्वरी गायन,हनुमान चालीसा,रामरक्षा,मृदंग यांच्यापासून व तरुण वर्ग हा दूर जात आहे त्यांचे वाचन व पठण नामस्मरण तसेच अनुकरण होत नसल्याने अल्पवयीन मुले व मुली तरुण पिढी ही वाम मार्गाला जात आहे हा विषय लक्षात घेऊन लहान बालकांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी सात वर्षापासून नांदगाव खंडेश्वर येथे श्री ज्ञानोबा तुकाराम बहुउद्देशीय संस्था अकोला द्वारा खंडेश्वरबाल संस्कार शिबिराचे आयोजन संचालक ह भ प उमेश महाराज जाधव (आळंदीकर) यांनी दिं. ५ मे पासून तर दिं. २० मे पर्यंत श्री शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे आयोजित केले होते,
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना गेले पंधरा दिवसापासून हरिपाठ, योगासने,ज्ञानेश्वरी गायन, पखवाज वादन,समाजामध्ये कसे वागावे संस्कारीत जीवन कसे जगावे माता पितांचा आदर कसा करावा, थोरमोठ्या आदर कसा करावा हे शिकवण्यात आले,या शिबिराच्या
समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांनी गेली पंधरा दिवस प्राप्त केलेल्या गुणांचे प्रकटीकरण केले यात गीतेचे श्र्लोक, भजन चाल, मुदुंगवादन म्हणुन आपण आत्मसात केलेल्या कलेचे सादरीकरण केले, तसेच निरोप समारंभाच्या वेळी सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू रूपाने प्रेम जिव्हाळा,दिसून आली समारोपाच्या दिवशी अक्षय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व वारकरी मुलांना प्रत्येक शिबिराथीना एक स्कूल बॅग देण्यात आली,
शिबिराचा समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामायणाचार्य ह भ प विशाल महाराज बडे हे उपस्थित होते.तर विशेष उपस्थिती म्हणून आमदार प्रताप अडसड, धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ प्रमुख अतिथी राजेश पाठक,पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे, प्रकाश मारोटकर, सतीश पटेल,उमेश दहातोंडै संरपच, शिबिर मुख्याध्यापक ह.भ.प.सुरज महाराज पोहकार ,ह.भ.प.भूषण महाराज गिरी,ह.भ.प. अक्षय महाराज लांडे ,ह.भ.प.विठ्ठल महाराज भेंडे ,गोपाल काकडे ह.भ.प.सोपान महाराज भटकर, पवन ठाकरे, ह.भ.प. विशाल महाराज मालगे,
अमन मालवे ,अभिषेक पवार ,सुरज कडू, गोविंदा धंनधरे, वैभव कुलकर्णी ,पुरुषोत्तम इखार, ह.भ. प.नामदेव निचत यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश महाराज जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुरज महाराज पोहकार यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी तालुक्यातील बहुसंख्य महिला पुरुषांची उपस्थिती होती.
Comments