अंजनगाव बारी-खिरसाना पाणंद रस्त्याला मुहूर्त मिळेना.
१२ वर्षापुर्वी खडीकरण झालेल्या रस्त्याचे काम सुरू केव्हा होईल, शेतकऱ्यांचा सवाल.
उत्तम ब्राम्हणवाडे.
कोरोणा काळापासून ते आतापर्यंत अंजनगाव बारी परिसरातील १२ पाणंद रस्त्याचे रखडले ते रखडले त्यात काही पाणंद रस्त्याचे खडिकरण झाले असतानाच डांबरीकरण रखडल्याचे चित्र आहे. त्यात काही जुने पाणंद रस्त्याचे काम तर कित्येक दिवसापासून रखडले असल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते.कागदोपत्री मान्यता मिळालेल्या पाणंद रस्त्याना मुहूर्त कधी मिळेल? या विवंचनेत शेतकरी पडला असुन शेतकऱ्यांसाठी हे रस्ते होणे एक दिवास्वप्न असल्यागत वाटत आहे.
त्यातच शेतकऱ्यांना अशा रस्त्याच्या कामाला लोकप्रतिनिधी होत असलेले दुर्लक्ष पाहता शेतकऱ्यांना स्वतः लोकवर्गणीतून पाई-पाई जोडून रस्त्याची उभारणी करावी लागत असल्याचे चित्र अंजनगाव बारीत पहायला मिळत आहे. लोकप्रतिनिधीसाठी व जनलोकप्रतिनीधी हे अत्यंत खेदाची बाब असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अंजनगाव बारी-खिरसाना १९८३-८४ दरम्यान सुरु झालेली ३.५ कि.मी पाणंद रस्त्याची १९९०-९१ मध्ये तीन वेळा लोकवर्गणीतून दुरुस्ती झाल्याचेही समजते.शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या रस्त्याला दोन नाले मिळत असल्यामुळे पावसाळ्यात तर या रस्त्याचे हाल काय ते विचारायलाच नको.दोन्ही गावातील ग्रा.पं.प्रतिनिधी सल्लामसलत करून हा कित्येक दिवसापासून रखडलेला पाणंद रस्ता पुर्णःत्वास नेण्यासाठी तयारी दाखवायला हवी.नाहीतर शेतकऱ्यांना पुन्हा लोकवर्गणीतून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची नामुष्की करावी लागेल व संबंधित विभागाचा नाकार्तेपणा एकदा पुढे आल्याचे समजून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे एकदा समोर आल्याशिवाय राहणार नाही.
Comments