माऊली (चोर) येथे एसटी वाहक चालकाचा मनमानी कारभार
माऊली (चोर) येथे एसटी वाहक चालकाचा मनमानी कारभार
उत्तम ब्राम्हणवादे.
तालुक्यातील माऊली (चोर) येथे एसटी सुपर बस थांबा दिला असून सुद्धा एसटी बसचे चालक वाहक मोठ्या प्रमाणात गाड्या थांबवत नाहीत आणि प्रवाशांना योग्य ती वागणूक न देता त्यांना एसटीचा थांबा नाही म्हणून सांगतात अशावेळी बाहेरून येणारे प्रवासी घाबरतात अमरावती ,बडनेरा ,नांदगाव खंडेश्वर नेर ,यवतमाळ ,येथून बसणारे प्रवासी बसू शकत नाही त्यांना थांबा नाही म्हणून असे स्पष्ट सांगतात त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो व शाळेच्या विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही तेव्हा संबंधित आगार प्रमुख विभाग नियंत्रक अधिकारी, विभागीय व्यवस्थापन अधिकारी यांनी ह्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे आवश्यक आहे आणि चालक वाहक यांना योग्य ते समज देऊन माऊली थांब्यावर गाडी थांबवावी व प्रवाशांना विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा अन्यथा ग्रामपंचायतच्या द्वारा तशा प्रकारचा ग्रामसभेचा ठराव करण्यात आलेला आहे की योग्य प्रमाणात थांबा न दिल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशी सूचना वजा विनंती संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात येईल तेव्हा प्रवाशांना विद्यार्थ्यांना त्रास न होता वरिष्ठ पातळीवर यावर निर्णय घ्यावा अशी मागणी उपसरपंच राजेंद्र सरोदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
Comments