नांदगाव खंडेश्वर येथील १३२ के.व्हि.चा प्रस्ताव मंत्रालयात पडला धूळखात.

तालुक्यात अघोषित लोडशेडींगचा मात्र उच्चाक.

तालुका वासीयांना दिलासा मिळणार कधी.?


उत्तम ब्राम्हणवाडे.


नांदगाव खंडेश्वर येथे प्रस्तावित असलेल्या 132 के.व्ही.चा योग्य असा पाठपुरावा लोकप्रतिनिधीकडून नसल्यामुळे तो प्रस्ताव मंत्रालयातील ऊर्जा भवन येथे धुळखात पडून असल्याने या प्रस्तावाच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्याचप्रमाणे तालुक्यातील येनस येथे गेल्या आठ वर्षांपासून प्रस्तावित असलेले 33 के.व्ही.विद्युत केंद्र मंजुरी नसल्याने हा प्रस्तावसुद्धा मंत्रालयात अजूनही निविदा प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्याला कुणी वाली आहे अथवा नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे हे दोन्ही प्रस्ताव आता मंजूर होणार किव्हा नाही ? याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात नसेल तेवढे लोडसेडिग नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये करण्यात येत आहे शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये दिवसाला दर पाच मिनिटांनी लाईन जाते तसेच रात्रीला सुद्धा चक्क एक तास लोडशेडिंग करण्यात येते यामुळे शहरासह तालुक्यातील संपूर्ण जनता विद्युत विभागाच्या या हेकेखोरीला प्रचंड कंटाळलेली आहे नांदगाव खंडेश्वर येथील विद्युत विभागाचे कर्मचारी हे दररोज अमरावती वरून अंपडाऊन करत असल्यामुळे त्यांचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यावर कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याचे दिसत आहे याचा त्रास मात्र तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात होत आहे या तालुक्यात लोडशेडिंगचा प्रचंड त्रास असल्यामुळे नांदगाव खंडेश्वर शहराकरिता १३२ के. व्ही.चा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास संपूर्ण तालुकावासी यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून समृद्धी महामार्ग गेल्यामुळे या महामार्गालगत लवकरच औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे त्यामुळे नांदगाव खंडेश्वर येथे 132 के.व्ही. विद्युत केंद्राची नितांत आवश्यकता आहे. मात्र या प्रस्तावाचा योग्य पाठपुरावा नसल्यामुळे मंत्रालयात थंड बस्त्यात पडलेला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विद्युत विभागाचे अधिकारी मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहेत. सध्यपरिस्थितीमध्ये अमरावती जिल्ह्याला अच्छे दिन असून या जिल्ह्याचे पालकमंत्रीच हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडेच ऊर्जा खाते 
 सुद्धा आहे तसेच या विभागाचे खासदार आणि आमदार सुद्धा फडणवीस यांच्याच पक्षाचे आहेत त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करून आणण्यात कोणतीही अडचण नाही पण खरी आवश्यकता आहे ती इच्छाशक्तीची आणि योग्य पाठपुराव्याची. जिल्ह्याचे पालकमंत्री हे विकास कामात कोणतेही राजकारण करीत नाहीत अशी त्यांची ख्याती आहे परंतु असे असताना सुद्धा नांदगाव खंडेश्वर येथे 132 के.व्ही. विद्युत केंद्राच्या प्रस्तावाच्या मंजुरीला इतका कालावधी का ? हे एक नाव उलगडणारे कोडेच आहे.

 येनस येथील ३३ के.व्ही. उपकेंद्राचे भिजत घोंगडे.

नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या येणस येथे गेल्या आठ वर्षांपूर्वी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी 33 के. व्हि. विद्युत उपकेंद्र मंजुरीचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला असून या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी न मिळाल्याने हा प्रस्ताव एक भिजत घोंगडे झाले आहे या प्रस्तावाचा सुद्धा योग्य असा पाठपुरावा नसल्याने हा प्रस्ताव मंजूर होणार किंवा नाही हे सुद्धा सांगणे कठीण झाले आहे याबाबत लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस लोटसेडिंगचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे परंतु नागरिकांच्या या समस्येची कुणालाही देणे घेणे नसल्याचे यावरून दिसून येत आहे. नांदगाव खंडेश्वर येथील 132 के.व्ही. सह येनस येथील 33 के.व्हीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास तालुका वासीयांना असह्य झालेल्या लोडशेडिंग पासून फार मोठा दिलासा मिळणार आहे परंतु लोकप्रतिनिधींना याबाबत काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे हे दोन्ही प्रस्ताव मंजूर होणार किंवा नाही याबाबत अनेक तर्क कुतर्क वर्तविल्या जात आहे. वरील दोन्ही प्रस्ताव हे थंड बसत्यात असल्याने हे मंजूर होणार किंवा नाही याबाबत सांसकता निर्माण झाली आहे.
नांदगाव खंडेश्वर येथे प्रस्तावित असलेले १३२ के.व्ही.विद्युत सबस्टेशन त्याचप्रमाणे तालुक्यातील येणस येथील प्रस्तावित असलेले ३३के.वी.चे सबस्टेशन मंजुरीबाबतचे दोन्ही प्रस्ताव हे मंत्रालयात गेले आहेत याच्या मंजुरी करिता आपण दोनवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांना दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आहे याबाबत आपला सतत पाठपुरावा सुरू आहे.तसेच माझा सबधित विभागासोबत पत्रव्यवहारसुद्धा सुरू आहे लवकरच दोन्ही प्रस्ताव आपण मंजूर करून आणणार आहोत तालुकावासियानी याबाबत चिंता करू नये.
- आ.प्रताप अडसड 
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात