अधिकाऱ्यांच्या खांबुगिरीमुळे नांदगाव तालुका जाणार काळोखात.
रेनुकापुर ते नांदगाव ३३ के.वी. लाईन मंजुरीनंतरही कामाला सुरुवात नाही.
शेतकरी आणि नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विजेची समस्या ही काही अंशी दूर व्हावी म्हणून गेल्या पाच वर्षापूर्वी नेर परसोपत तालुक्यातील रेनुकापुर येथून नांदगाव खंडेश्वर परेंत एक हायटेन्शन लाईन घेण्याच्या प्रस्तावाला विद्युत विभागाने मंत्रालयात मंजुरीकरिता पाठविला होता.या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली त्यानंतर मोठ्या महत प्रयासानंतर मंत्रालयातून सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला परंतु विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खाबुगीरीचा फटका या तालुक्याला मोठ ब प्रमाणात बसत असून अधिकाऱ्यांच्या हेकेखोरीमुळे 33 के.व्ही.विद्युत पुरवठा होणाऱ्या या हायटेन्शन लाईन घेण्याच्या कामाला अधिकाऱ्याकडून हेतूपरसपर विलंब लावण्यात येत असल्याचा आरोप नांदगाव खडेश्वर तालुकावासियानी लावला आहे.हे गेल्या अनेक दिवसापासून हे काम थंडबसत्यात असल्याने या कामाची
निविदा प्रक्रिया व कार्यारंभ होऊन सुद्धा अद्यापही कामाची सुरुवात करण्यात न आल्याने हे काम सुरू होणार किव्हा नाही ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हेतूपरस्परपणे या कामाच्या सुरू न होण्यामागे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचा काय हेतू असू शकतो ? हे समजायला मार्ग नसल्याने सदर काम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही लवकरच जर हे काम सुरू झाले नाही तर आगामी पंधरा दिवसावर येऊन ठेपलेल्या पावसाळापूर्वी जर आपल्या नियोजित वेळेवर सुरू न झाल्यास हे काम पुन्हा चार महिने विलंबाने सुरू होईल परिणामी संपूर्ण नांदगाव खंडेश्वर तालुका हा अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही ? हे उल्लेखनीय! त्यामुळे या विभागाच्या आमदार महोदयांनी याकडे जातीने लक्ष देऊन या कामाला हेतुपरस्पर विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्याची कानउघाडणी करून लवकरात लवकर या कामाला सुरुवात करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
विद्युत विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना यावर्षी सुद्धा वीज मिळणार नाही हेच यावरून स्पष्ट होत असून ह्या विद्युत वहिनीचा प्रश्न गेल्या 5 वर्षापासून प्रलंबीत आहे आता डिसेंम्बर 2022 महिन्यामध्ये निधीची पूर्तता करून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे मे महिना संपायला केवळ 15 दिवसाचा कालावधी शिल्लक असताना आणि सदर शेतकरी हिताचे काम असल्यामुळे विलंब तर होत नाही ना ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत या विभागाच्या आमदार महोदयांनी याकडे जातीने लक्ष देऊन याची दखल घ्यावी आणि काम सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न करावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी आणि शेतकरीवर्गाने केली असून हे काम लवकरात लवकर सुरू न केल्यास विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.
Comments