नांदगाव खंडेश्वर येथे आपला दवाखान्याचे लोकार्पण संपन्न.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला.
दवाखाना जनतेच्या सेवेत रुजू.
आमदार प्रताप अडसड यांनी केले उद्घाटन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला त्यानुसार पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यात एक मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर नांदगाव खंडेश्वर येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना आ. प्रताप अडसड म्हणाले की, धामणगाव रेल्वे मतदार संघातील धामणगाव रेल्वे,नांदगाव खंडेश्वर, आणि चांदुर रेल्वे,तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा या दवाखान्या मार्फत पुरविण्यात येणार आहे याकरिता महाराष्ट्र शासनाने या दवाखान्याची निर्मिती केली आहे या दवाखान्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आ. अडसड यांनी नागरिकांना केले.
नांदगाव खंडेश्वर येथील चांदुर रेल्वे रोडलगत असलेल्या लध्दाणी कॉम्प्लेक्समध्ये हा दवाखाना सुरू करण्यात आला आहे दररोज दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा दवाखाना सुरू राहणार असल्याची माहिती प्रास्ताविकातून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे यांनी दिली. डॉ.मालखेडे पुढे म्हणाले की, या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणीसह औषधोपचार, किरकोळ जखमेवर मलमपट्टी, आणि यासह 147 प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा या दवाखान्यामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच या व्यतिरिक्त येक्स रे मशीन, सोनोग्राफी आदी चाचण्याकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष तज्ञांच्या सेवा देखील पुरविण्यात येणार असून या सुविधा डायग्नोस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मालखेडे यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकातून दिली दिली. यावेळी आ. प्रताप अडसड यांचा तालुक्यातील आशा गटप्रवर्तक यांच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी,ठाणेदार विशाल पोळकर, प्रशांत वैद्य, प्रमोद पिंजरकर, अविनाश ब्राह्मणवाडे, नवलचंद खिची, विलास वितोंडे,निकेत ठाकरे, ऋषिकेश ढेपे,पुरुषोत्तम बनसोड, माया देशमुख,अमोल मारटकर रणजीत खंडाळकर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन आरोग्य कर्मचारी राजू मेश्राम यांनी तर
आभार प्रदर्शन सचिन बाहेकर यांनी केले. कार्यक्रमाला लोणी (टाकळी) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता सरदार, डॉ.चव्हाण,डॉ.डवरे, मंगरूळ (चव्हाळा) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी दिघाडे,डॉ.पूजा वानखडे, सातरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रंजू धोत्रे, धामक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.राजरत्न मनवर, पापड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक लांडगे यांचेसह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments