नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव.

नागरिक त्रस्त; अधिकारी अपडाऊन मध्ये व्यस्त.


शहरातील बत्ती दिवसासह रात्रीसुद्धा होते गुल्ल. 


उत्तम ब्राम्हणवाडे.


नांदगाव खडेश्वर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून 24 तास विजेचा लपंडाव सुरू असल्याने शहरवासी चागलेचं त्रस्त झाले आहेत.
 विद्युत विभागाचे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकाना अनेक संमस्येला सामोरे जावे लागत आहे आणि याकडे तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही किंवा कुणी याबाबत आवाजही उचलायला तयार नसल्याने विद्युत विभागाचे अधिकारी चांगलेच निर्ढावलेले आहेत आणि येथील विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना याच्याशी काहीही देणेघेणे नसल्याने ते मस्त अमरावती वरून दररोज अपडाऊन करून फक्त ऑफिस वेळेत नागरिकांची कामे उरकून पुन्हा अमरावतीला पसार होण्याची त्यांना घाई असते ? अशी चर्चा शहरामध्ये सुरू आहे ते ऑफिसमध्ये आल्यावरही त्यांचा बहुतांश वेळ हा चहाच्या टपरीवरच जातो हे विशेष ! त्यांच्या या सवयीमुळे त्यांचे कोणत्याही कर्मचाऱ्यावर वजन नसल्याने येथील कर्मचारी सुद्धा कुणाचेही ऐकत नाही त्यामुळे नागरिकांच्या समस्या दिवसे दिवस वाढतच आहे नांदगाव खंडेश्वर शहरात दररोज पंधरा ते वीस मिनिटांनी लाईन जाणे येणे करते.याबाबत विद्युत विभागाचे कोणतेही अधिकारी नागरिकांना काहीही सांगायला सुद्धा तयार नसल्याने नागरिकांनी जावे तरी कुठे ? याचे उत्तर विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनीच नागरिकांना दिलेले बरे.अन्यथा नागरिकांच्या असंतोषाचा विस्फोट कधीही होऊ शकतो. हे मात्र निश्चित.
नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये 24 तासात दर 15 ते 20 मिनिटांनी विद्युत पुरवठा चालू बंद होतो आहे.त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, नवजात बालक, गर्भवती माता यांना उष्णतेचा फटका बसतो आहे.शिवाय, विजेच्या या लपंडावामुळे विद्युत यंत्र , वस्तू बिघाड होत आहेत याबाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असून विद्युत विभागाच्या या अरेरावीलां जनता चागलीच कंटाळली असल्याचे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात