अंजनगाव बारीत एअरटेल व जिओ नेटवर्क(रेजच्या)बाबतीत कोमात.

रेंजच्या समस्येमुळे काँल डाँपच्या संख्येत वाढ,कंपन्या कडून ग्राहकांची फसवणूक,नागरिक त्रस्त.

 उत्तम ब्राम्हणवाडे.

येथील १५ हजार लोकसंख्येच्या गावाचे गाव असणाऱ्या अंजनगाव बारी येथे नेटवर्क(रेजच्या) समस्येमुळे ग्राहकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. यामध्ये जिओ व एअरटेल या कंपन्यानी आपली फिकेव्हेन्सी कमी केल्यामुळे नागरिकांना नेटवर्क समस्येतून जावे लागत आहे. महागडे रिचार्ज व न परवडणारे पँन्स यामुळे ग्राहकांवर वाढता बोजा पडत असुन त्यातही कंपन्यांच्या नेटवर्क(रेंज) समस्येमुळे ग्राहक त्रासले असुन कंपन्याविषयी रोष नागरीकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
              जिओ आणि एअरटेलचे ग्राहक नेटवर्कच्या समस्येमुळे दुसऱ्या कंपन्याशी जुळत असून दोन टाँपच्या नेटवर्क सिमचे ग्राहक दिवसेंदिवस कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रिचार्जचे महागडे दर बघता नेटवर्क जर व्यवस्थित मिळत नसेल तर ग्राहकांना पर्याय म्हणून हे पाऊल उचलावे लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
रेंजच्या समस्येमुळे काँल डाँपच्या समस्येत वाढ होत असून ,कंपन्या कडून ग्राहकांची फसवणूक,होत असल्याची ओरड ग्राहकांतून उमटत आहे.
      परिसराचा विचार करता कंपनीने ज्या ठिकाणी आपले टावर उभारले त्या जागीही हिच समस्या जाणवत असल्याने ग्राहकांना विचार करण्यास भाग पडत आहे. कंपनीच्या बाबतीत बऱ्याच नागरीकांनी आँनलाईन तक्रारी ई-मेल द्वारे केल्या असता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या असता कर्मचाऱ्यांरी नेटवर्किंगच्या बाबतीत आग्रही नसुन वरिष्ठाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. ग्राहकांच्या समस्या सोडवण्यास त्यांना कुठलाही रस नसून ग्राहकांना समस्याचे निराकर करण्यास सशपेल फोल ठरल्याची ओरड ग्राहकांमधून येत आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात