एका सच्चा शिवसैनिकाला अनेक वर्षानंतर मिळाला न्याय.
विलास (पाटील)सावदे झाले बाजार समितीचे उपसभापती.
सहकार नेते अभिजित (पाटील) ढेपे याचे आहेत समर्थक.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक झाली यामध्ये सभापती म्हणून प्रभात (पाटील) ढेपे यांची तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात (उद्धव ठाकरे गट) शिवसेनेची जेव्हा मुहूर्तमेढ रोवल्या गेली तेव्हा पासून शिवसेनेसोबत असलेले एक सच्चे आणि कडवट शिवसैनिक म्हणून तालुक्यात सर्वपरिचित असलेले विलास (पाटील) सावदे यांची बाजार समितीच्या उपसभापती पदी एकमताने निवड करण्यात आली.
गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेत कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ पक्ष कसा मोठा होईल याकरिता आपल्या जीवाचे रान करून केवळ पक्ष मोठा करणे येवढेच धेय्य या कडव्या शिव सैनिकाचे असून एक अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते.गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रामध्ये सावदेहे सहकार नेते अभिजित (पाटील) ढेपे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत परंतु तिथे सुद्धा त्यांनी पदाची कोणतीही अपेक्षा ठेवली नाही अखेर बाजार समितीच्या सर्व नवनियुक्त संचालकांनी एकमताने उपसभापती पदाकरिता त्यांच्या नावाची घोषणा केली त्याला सहकार नेते अभिजीत ढेपे (पाटील) यांनी अनुमोदन दिले त्यामुळे बाजार समितीच्या रूपाने का होईना एका स्वच्छ आणि कडवट शिवसैनिकालां गेल्या अनेक वर्षानंतर आपल्या प्रामाणिकपणाची पावती मिळाली आहे. त्याचप्रमाणे बाजार समितीचे नवनियुक्त सभापती प्रभात (पाटील) ढेपे हे सहकार नेते अभिजीत (पाटील) ढेपे यांचे चुलत बंधू आहेत.नवनियुक्त सभापती उपसभापती यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. सहकार नेते अभिजीत (पाटील) ढेपे यांच्या सोबत सहकार क्षेत्रामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हा अनेक वर्षापासून सोबत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त उपसभापती सावदे हे अत्यंत मनमिळाऊ शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात.ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कणी ( मिर्झापूर ) ग्रामपंचायतीचे सलग १० वर्षे सरपंच सुद्धा होते.
बाजार समितीचे नवनियुक्त सभापती प्रभात (पाटील)ढेपे हे सुद्धा अत्यंत शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून तालुक्यात परिचित आहेत. यावेळी नांदगाव खंडेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापती आणि उपसभापतीच्या रूपाने शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आणि कर्तव्य संपन्न नेतृत्व मिळाले आहे त्यांच्या कार्यकाळात बाजार समिती चांगल्या प्रकारे झेप घेईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गात व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आपल्या कार्यकाळात तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय देऊन शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने मान सन्मान राखला जाईल त्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव कसा मिळेल व शेतकरी हिताचे निर्णय कसे घेतले जाईल याबाबत आम्ही प्रयत्नशील असणार आहोत तसेच आपल्या कार्यकाळात बाजार समितीची भरभराट कशी होईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार असल्याचे नवनियुक्त सभापती उपसभापती यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.
Comments