नांदगाव खंडेश्वर येथे "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिबिर संपन्न.
स्त्री शक्ती समाधान शिबिर.
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे आयोजन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे वतीने महिलांच्या शासकिय विभागाकडे ज्या तक्रारी अनेक दिवस प्रलंबित राहतात,त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यास वेळ लागतो.याकरीता राज्याचे महिला व बालविकास मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी सदर शिबिर आयोजित करण्याबाबत सर्व राज्यातील जिल्ह्याना निर्देश दिल्याने अमरावती जिल्ह्यात सुद्धा या शिबिराचा सुरुवात करण्यात आलेली आहे त्यानुसार नांदगाव खंडेश्वर येथे सुद्धा या शिबिराला सुरुवात झाली असून.या शिबिरामध्ये सर्व विभागांच्या तक्रारी पंचायत समिती, तहसील, नगरपंचायत, महिला बालकल्याण विभाग,इतर सर्व विभागांच्या महिलांच्या समस्या व तक्रारीची नोंद घेण्यात येणार असल्याने या शिबिराचे आयोजन नांदगाव खंडेश्वर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला तहसीलदार पुरूषोत्तम भुसारी,यांचे अध्यक्षतेखाली व बालविकास प्रकल्प अधिकारी विरेंद्र गलफट , तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मेश्राम,दहिकर (प्रशासन अधिकारी ) महिला व बालकल्याण विभाग कु.फुलाडि अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.रेखा साखरे,सौ.सुरेखा लोरे.श्रीमती.दिपाली.ढवने ,उमेद कक्षाच्या श्रिमती कुंभलवार,सौ.कमल धुवै (विस्तार अधिकारी. )आरोग्य,अभिजित लोखंडे (नगर पंचायत विभाग.)महिला आर्थिक महामंडळ कु.मारोडकर.
या शिबिरात जवळपास ७४ महिलांनी आपला सहभाग नोंदविला होता. वीरेंद्र गलफट (बालविकास प्रकल्प अधिकारी) यांनी सदर योजनेबाबत उपस्थित महिलांना माहिती देऊन मार्गदर्शन केले.तसेच तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी , अँड.भाकरे,दहिकर यांनी सुध्या मार्गदर्शन केले.
Comments