राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन सुरू.
१ मे पासून सुरू असलेल्या आंदिनाची अद्यापही दखल नाही.
शासनाने मागण्या मंजूर करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
मागील २० ते २५ वर्षांपासून महाराष्ट्रात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी काम करीत असलेले २ हजार २०० हुन अधिक कंत्राटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यल्प मानधनावर काम करींत आहेत.महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेच्य वतीने आपल्या मागण्यांना घेऊन हे कर्मचारी यांनी वेळोवेळी शासन दरबारी अनेकदा निवेदने देऊनही शासनाने आश्वासना खेरीज काहीच दिले नाही.परिणामी, महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनेचे वतीने दि. १ मे महाराष्ट्र दिना पासून लेखणी,डाटा एन्ट्री बंद आंदोलन सुरू केले आहे. क्षयरोग विभागात कंत्राटी कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करीत आहे. मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली होती. मात्र,शासनाने आश्वासना शिवाय काहीच केले नाही.यामुळे संतप्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या एकूण सात मागण्यांना घेऊन हा लढा उभारला आहे. यामध्ये सर्व कर्मचारी यांचे विनाशर्त समायोजन करण्यात यावे.तोपर्यंत १) सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनात सरसकट ४० % वाढ करण्यात यावी,२) कार्यरत सर्व कर्मचाऱ्याना एपीएफ त्वरित लागू करावा,३)संसर्गजन्य आजारासाठी काम करीत असल्यामुळे कर्मचारी यांना जोखीम भत्ता रुपये-५ हजार प्रति माह त्वरित लागू करण्यात यावा ,४)कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांना मृत्यू / अपघात विमा संरक्षण देण्यात यावे,५)इंधन व प्रवास भत्त्यामध्ये मागील १५ वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.तरी त्यात १००% वाढ करण्यात यावी,६)शासनाने जाहीर केलेली एच. आर. पॉलिसी सुधारित पद्धतीने त्वरित लागू करण्यात यावी.,७)९० दिवसांची पूर्णपगारी वैद्यकीय रजा त्वरित लागू करण्यात यावी.अश्याप्रकरच्या उपरोक्त मागण्यांना घेऊन शासन स्तरावर सकारात्मक लेखी बंद करण्याचा निर्णय सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे, याकरिताच दि. १ मे २०२३ पासुन लेखणी ( निक्षय पोर्टल,अहवाल,मिटिंग,व्हीसी) बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यादरम्यान रुग्णसेवा सुरळीत राहील याची दक्षता घेतली जाते आहे. क्षयरोग विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचे सोमवार दिनांक १ मे २०२३ पासून लेखनिबंद आंदोलन सुरू झाल्यानं उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन सर्वस्वी जवाबदार राहील.ही बाब यावेळी महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटनाचे वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.१ मे पासून सुरू असलेल्या या आंदोलनाची कोणतीही दखल शासनाने अद्याप पर्यंत घेतली नसल्याने सर्व कंत्राटी कर्मचारी आक्रमक झालेले दिसून येत आहे शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन सर्व मागण्या मंजूर करण्याची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे.
Comments