नांदगांव खंडेश्वर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले.
शेतकर्यांचे लाखों रुपयांचे नुकसान.
उत्तम ब्राम्हणवाडे.
गेल्या आठवड्याभरात नांदगांव खंडेश्वर तालुक्यात संततधार अवकाळी पाऊस व गारपीट मोठ्याप्रमाणात होत असून अचानक झालेल्या पावसाने तालुक्यातील शेतकर्यांच्या उन्हाळी रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यात कांदा, फळभाज्या व फळबागांची नुकसान झाले आहे.तालुक्यातील फुबगाव येथील शेतकरी नरहरि पाठक यांनी आपल्या 5 एकर शेतीत 11 डिसेंबर रोजी कांदा या पिकाची लागवड केली होती. कांदा परिपक्व झाल्यावर काढणी करण्यासाठी जमिनीतून बाहेर काढून ऊन देण्यासाठी शेतातच पिकाला ठेवले मात्र निसर्गाने त्यावर कुठलीच दया न करता संपूर्ण पिकाची नासाडी केली. यामुळे शेतकरी पाठक यांचे अंदाजे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले असून लवकरात लवकर शासनाने नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments