नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत मध्ये कामाच्या निविदा होतात मॅनेज.

एक्सप्रेस फिडरचे काम जास्त रेट असलेल्या ठेकेदाराला देण्याचे प्रयत्न. 

कमी रेट असलेल्या ठेकेदाराना नाकारले काम.

विद्युत ठेकेदार असोसिएशन जाणार न्यायालयात. 

उत्तम ब्राम्हणवाडे.

"नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचा एक नवीन कारनामा नुकताच समोर आलेला असून विद्युत लाईन संदर्भातील निविदा ओपन न करता कमी दरात व सर्व अटीत बसणाऱ्या निविदा अपात्र करून मर्जीतल्या ठेकेदाराला नगरपंचायत काम देण्याच्या तयारीत असल्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
याबाबत विद्युत ठेकेदार असोशियनने नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायतीच्या या हेकेखोरीचा जाहीर निषेध केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त्त असे की, नांदगाव खंडेश्वर शहराकरिता नजीकच्या चांदी प्रकल्पावरून पिण्याचे पाण्याची व्यवस्था सद्यस्थित शहरामध्ये सुरू आहे परंतु त्या ठिकाणी म्हणजे चांदी प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात विद्युत भारनियमन असल्याने तेथे विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे नांदगाव खंडेश्वर शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा याकरिता चांदी प्रकल्पावर एक एक्सप्रेस फिडर असलेली डीपी उभारण्यात यावी याकरिता एक कोटी नऊ लक्ष रुपयाचे अंदाजपत्रक नांदगाव नगरपंचायत कडून तयार करण्यात आले त्याला मंजूरी पण मिळाली आहे ही विद्युतजोडणी नजीकच्या पापळ येथील विद्युत केंद्रापासून चांदी प्रकल्पापर्यंत जोडण्यात येणार आहे तसेच हे स्वतंत्र एक्सप्रेस फिडर असणार आहे त्यामुळे याबाबतचे अंदाजपत्रक तयार करून याला शासकीय मंजुरात घेऊन नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतने दि.6 मार्च 2023 रोजी कामाची निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार काही विद्युत ठेकेदारानी आपल्या निविदा दि.15 मार्चपर्यंत नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे सादर केल्या होत्या.परंतु नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतने विद्युत उभारणीचे कामासंदर्भात कामाच्या रेटमध्ये स्पर्धा होऊ न देता जवळच्या आणि आपल्या खास मर्जीतल्या विद्युत ठेकेदाराला काम देण्याकरिता संगमत करून कामाचे संदर्भात आदेश काढण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप विद्युत ठेकेदार असोसिएशनने केला आहे या कामाबाबतच्या एकूण 7 निविदा नगर पचायतीकडे प्राप्त झाल्या असताना त्यापैकी 4 निविदा ठेकेदाराने काम करण्याकरिता कमी रेट दराने सादर केलेल्या होत्या .पण नगरपंचायतिच्या अधिकाऱ्यांनी ज्या निविदा वेळेत अटी आणि शर्ती मागितल्या होत्या त्या पूर्ण असताना येथून दोन महिन्यांनी म्हणजे दिं.8 मे 2023 रोजी एकूण 4 निविदा ठेकेदाराना मेल करून अपात्र केल्या आहेत. ते ठेकेदार कमी रेटने काम करण्यासाठी खरे निविदा स्पर्धेत होते. आणि कामासंदर्भात अनुभवी ठेकेदार असताना त्यांनाच या मधून बाद करण्यात आले आहे निविदा रद्द करण्यात आलेल्या ठेकेदारांनी म्हटले आहे की, अंदाजपत्रकाच्या रेट पेक्षा कमी रेटने काम करणे म्हणजे नगरपंचायतचा फायदा होणे असे असताना नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतने कोणत्या अपेक्षा पाहून निविदा संगणमत करून मेनेज करून कामाचा आदेश जास्त दराच्या ठेकेदाराला देण्याचा प्रयत्न सुरू केला असा आरोप विद्युत ठेकेदार असोसिएशने केला आहे. याबाबत विद्युत ठेकेदार असोशियनचे असे म्हणणे आहे, की आम्ही निविदा विकत घेतो , निविदा स्पर्धेत भाग घेतो , आणि लाखो रुपये अमानत रक्कम भरतो आणि दोन,दोन महिने पैसे अडकवून ठेवतो व आम्हाला निविदा उघडण्याच्या आधीच अपात्र नगरपंचायत करते म्हणजे याचा काय अर्थ आम्ही लावायचा.? नादगाव खंडेश्वर येथील नगरपंचायत ही आपल्या जवळच्या आणि खास मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्याचा प्रयत्न करीत आहे असेच यावरून आमच्या निदर्शनास येत आहे.येवढेच करायचे होते तर मग कशाला नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी निविदेला प्रसिद्धी दिली ?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विद्युत ठेकेदार असोसिएशन यांनी पुढे म्हटले आहे की, नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायतचे अधिकारी हे विनाकारण शासनाच्या निधीची उधळपट्टी करीत आहे.कमी निधीमध्ये काम होत असताना जास्त दराने निविदा मंजूर करण्याचा खटाटोप ते का करीत आहे हे समजायला मार्गच नसल्याचे सुद्धा त्यांनी म्हंटले आहे.

..............................................

 आम्ही या कामा संदर्भात नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत कडे कमी रेटमध्ये निविदा संपूर्ण नियम आणि अटीच्या अधीन राहून सादर केल्या असताना आमच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.आणि त्यांच्या खास मर्जीतल्या विद्युत ठेकेदारांना हे काम देण्याचे प्रयत्न नगर पंचायतचे अधिकारी करीत आहेत त्यामुळे याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
  अरुण सावदे
पदाधिकारी,विद्युत ठेकेदार असोसिएशन.
............................................... 
निविदेतील अटी व शर्तीच्या प्रमाणे निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. काही ठेकेदारांनी E.P.F. हा सादरच केला नाही त्यामुळे त्यांचा निविदा रद्द करण्यात आल्या. तर काहींनी कंपनी फार्मचे ईपीएफ सादर केले नाही त्यामुळे त्या सुद्धा रद्द करण्यात आल्या निविदा प्रक्रियेत कुठलाही घोळ झालेला नाही सर्व प्रक्रिया नियमाने करण्यात येत आहे. आणि काम सुद्धा नियमानेच करण्यात येईल.
 विजय लोहकरे
( प्रभारी मुख्याधिकारी ) नगरपंचायत,नांदगाव खंडेश्वर.

Comments

Anonymous said…
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद!👍

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात