नांदगाव खंडे येथे भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन.
नांदगाव खंडे येथे भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
शुक्रवार 5 मे ते शनिवार 20 मे पर्यंत नांदगाव खंडेश्वर येथे श्री संत न्यानोबा तुकाराम बऊद्देशिय सेवा समिती अकोला द्वारा संचालित व नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर यांच्या सयुक्त विधमाने भव्य अश्या तालुकास्तरीय श्री खंडेश्वर सर्वागीन विकास बाल संस्कार शिबीराचे आयोजन येथील
शिवाजी हायस्कुलच्या मैदानावर करण्यात आले आहे.या शिबिराचे आयोजक व शिबीर संचालक भागवतचार्य उमेश महाराज जाधव आळंधिकर यांच्या मार्गदर्शनात होणार असून या शिबिरामध्ये दररोज हरिपाठ, अंभग,आध्यत्मिक विषय,ध्यान व प्रश्नोत्तरे. व्यसनमुक्ती. व्यक्तिमत्व विकास.गोरक्षणाचे महत्व. गायन वादन इत्यादी विषयावर मार्गदर्शन केल्या जाणार आहे याशिबीराला मुख्याध्यापक म्हणून ह.भ. प. भागवतचार्य सूरज महाराज पोहोकार. गोवर्धन महाराज खीरकर. सोपान महाराज भटकर. नामदेव महाराज निचत. भूषण महाराज गिरी. अक्षय महाराज लांडे. संजय महाराज लाड. विठल महाराज भेंडे हॆ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत या शिबिरादरम्यान श्री गुरु संजय महाराज पाचपोर. श्री गुरु ध्यानेश्र्वर महाराज वाघ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच अनेक संत मंहतआणि नामवंत कीर्तकार यांचेसह विविध लोकप्रतिनिधी,समाजसेवक यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे.नवीन पिढी सुसंस्कारीत व्हावी आणि त्यांच्यात प्रेम,बंधूभाव निर्माण व्हावा आईवडीलाचा. मोठयाचा आदर करणारी. व्यसनमुक्त पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने नांदगाव खंडेश्वर येथील भागवतचार्य उमेश महाराज जाधव (आळंदिकर) हे दरवर्षीच या शिबिराचे आयोजन करतात तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments