अपंगांच्या जीवनावश्यक मागण्यांसाठी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येते अपंगांचे ठिय्या आंदोलन.
जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम याचे नेतृत्व.
उत्तम ब्राम्हणवाडे
अपंगांचा जलदगतीने विकास व्हावा म्हणून शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केले जातात व वेळोवेळी आदेश दिले आहे . तरी सुद्धा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अपंग हा घटक विकासापासून वंचित राहत आहे व त्यांना न्याय मिळत नाही.यासाठी अपंग जनता दल संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावती च्या वतीने गुरुवार रोजी अपंग जनता दल जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलनाचे आयोजन केले यावेळी गटविकास अधिकारी श्री नाटकर याचा सोबत सर्व जीवनावशक मागण्यावर एक तास सविस्तर चर्चा करण्यात आली व येणाऱ्या 17 ताऱखेला बैठकीचे आयोजन करणार असे सांगितलं एकही अपंग शासकीय योजने पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले, या वेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा सचिव राहुल वानखडे,प्रमोद शेबे,कांचन कुकडे,विजय तेडे,अर्चना मोडले, नंदा ननंवरे,अरुणा इंगोले,वर्षा वाघमारे, कल्पना शेंडे,राजकन्या ओगले,प्रवीण पुराम,सुमन कुनबिथोप, भागेश्री कुणबीठोप, शीतल पाटोकार, गोपाल वनवे, सुनील दिगडे,सह 50 अपंग बांधव उपस्थित होते.
Comments