हज यात्रेसाठी जाणाऱ्यांना अतिरिक्त शुल्कात सवलत द्या.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन.
माजी नगरसेवक फिरोज खान यांची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
सन २०२३ यावर्षीच्या मुस्लिम बांधवांच्या हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज कमिटीमार्फत प्रवासाकरिता निर्धारित शुल्कावर नागपूर अथवा मुंबई विमानतळ असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. तथापि नागपूर विमानतळाचा पर्याय स्वीकारणाऱ्या हज यात्रेकरूंकडून ६३ हजार रुपयांचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंवर अतिरिक्त शुल्काचा बोजा पडत आहे. या अतिरिक्त शुल्कावर सवलत देण्यात यावे अशी मागणी नांदगाव खंडेश्वर येथील माजी नगरसेवक फिरोज खान यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठऊन केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
हज ही मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व पवित्र धार्मिक यात्रा असून या हज यात्रेसाठी लाखो भाविक महाराष्ट्रातून जात असतात. मात्र अनेक यात्रेकरूंची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. अतिरिक्त ६३ हजार रुपये उभे करणे त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करून नागपूर विमानतळाऐवजी त्यांना मुंबई विमानतळ देण्यात यावे किंवा ते शक्य नसेल तर अतिरिक्त शुल्कात सवलत द्यावी.अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे माजी नगरसेवक फिरोज खान यांनी केली आहे.
Comments