जान्हवी मानतकरची शूटिंग राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड.
राज्यस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत ठरली कांस्यपदकाची मानकरी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
येथील जान्हवी मानतकरची हव्याप्र मंडळ शूटिंग विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धे करिता नुकतीच निवड झाली आहे. जान्हवी मानतकरने औरंगाबाद येथे दिनांक 26 ते 29 एप्रिल 2023 या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अमरावती शूटिंग रेंज वयोगट (सतरा वर्षे,मुली) हिने दहा मीटर प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे.तिची शालेय स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.विजेती जान्हवी मानतकरने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांची भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला.
Comments