पेरणी तोंडावर आल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत.
भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचे सोयाबीन विकले नाही.
उत्तम ब्राम्हणवाडे.
गेल्या दोन वर्षीपूर्वी सोयाबीनला भाव दहा हजार रुपयेच्यावर होता या भावाचा फायदा शेतकऱ्यांना झाला नव्हता मागील एक वर्षी सोयाबीनची घट मोठ्या प्रमाणात झाला असल्याने शेतकऱ्यांकडे असलेले थोडेफार सोयाबीन ते विकून मोकळे झाले होते. आता मात्र अनेक शेतकऱ्यांनी दोन वेळेसचे सोयाबीन घरात ठेवले असून भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत असून आता खरीप हंगामातील पेरणी तोंडावर अली आहे. अजून सोयाबीनला म्हणावा तसा भाव आला नसल्याचे शेतकरी सांगत असून आता पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. या परिसरात शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे सोयाबीन आहे. या पिकावरच शेतकरी आपले जीवन अवलंबून आहेत. या पिकाच्या उत्पन्नातुन शेतकरी आपल्या कुटुंबाचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च करतो. या सोयाबीन पिकाला भाव चांगला मिळाला तर सुखी संसाराचा गाडा सुरळीत चालतो अन्यथा शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे चित्र आहे .
कारण सोयाबीन पिकास भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी दोन वर्षाचे सोयाबीन घरात ठेवले आहे तर हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांनी चालू वर्षाचे सोयाबीन भाव वाढेल या आशेने
ठेवले आहेत. सद्यस्थितीत प्रती क्विंटलचा भाव पाच हजार रुपयेच्या आसपास होता. शेतकरी हे सोयाबीनला दहा हजार भाव मिळेल या अपेक्षा बाळगून आहेत मात्र खरच यावर्षी सोयाबीनचा भाव कुठपर्यंत वाढेल किंवा कुठपर्यंत कमी होईल हे कुणालाच सांगता येत नाही. सोयाबीन मुख्य पीक असल्याने हे पीक घरातच असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडून द्विधा मनस्थितीत सापडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यापारी सुद्धा मार्केट मध्ये नागरिकांची उलाढाल नसल्याने चिंतेत आहेत.आता शेतकरी खरीप पेरणीच्या तय्यारीत असून खत बियाणे पेरणी खर्च मोठ्या प्रमाणात लागतो हा खर्च कसा भागवायचा असा विचार शेतकरी करीत आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक आहे दोन वर्षांपूर्वी अगोदरच शेतकऱ्यांचे कोरोनाने कंबरडे मोडले होते. आणि त्यात आता सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी तीव्र शब्दात आपल्या नाराजीची भावना व्यक्त करीत आहेत.
भाव वाढीचे स्वप्न भंगल्यातच जमा.
---------------------------------------------------------------
अनेक शेतकरी हे सोयाबीनचा भाव वाढेल या अपेक्षेने सोयाबीन घरात ठेवून भाव वाढण्याची प्रतीक्षा करीत होते मात्र भाव वाढला नसल्याने नाईलाजास्तव मोजके शेतकरी सोयाबीन विकत असल्याचे चित्र दिसत आहे. तर काही शेतकरी लग्न कार्यासाठी खर्च लागत असल्याने सोयाबीन थोडेफार कामापुरते विक्री करत आहेत तर काही शेतकरी पेरणीसाठी खर्च मोठ्या प्रमाणात लागत असल्याने त्या खर्चाची तडजोड उसने पासने पैसे घेऊन करण्याच्या तय्यारीत आहेत. मात्र सोयाबीनचे भाव वाढतील आशा आशेने शेतकरी एक वर्षांपासून भाव वाढेल या अपेक्षेत होता मात्र सोयाबीनचे भाव वाढण्याचे स्वप्न शेतकऱ्याचे भंगल्याचे चित्र दिसत आहे.
- ओंकार ठाकरे
अडते,कृउबास,नांदगाव खंडेश्वर
माझी मौजा धामक शिवारात शेती असून मला सोयाबीन पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी झाले भाववाढीच्या आशेने माझेकडे सोयाबीन अध्यापही पडून आहे . सध्यस्थीतीत खरिपातील मशागतीची कामे उधारी करून करण्यात आली . पेरणीचा हंगाम तोंडावर येवून ठेपला आहे . खते ,बी- बीयाने व ईतर बाबीसाठी पैस्यांची नितांत आवशकता आहे . सोयाबीनची भाववाढ थांबून असल्याने घरातच पडून आहे .
- प्रवीण चौधरी
शेतकरी, धामक
Comments