महागाईमुळे शेतीची मशागत झाली अवघड.

चारा,पाण्याअभावी यांत्रिक शेतीवरच शेतकऱ्यांचा भर.


 उत्तम ब्राम्हणवाडे.

 नोकरीला उच्च दर्जा मिळाल्याने शेती तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्यात महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे पीक घेणे सोडा मशागत करणेही वर्षभर कठीण होत चालल्याचे चित्र सध्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पहायला दिसून येत आहे. आधुनिक युगात शेती व्यवसाय करताना बैल जोडी साभाळणे दुरापास्त होत चालले आहे. कारण बैलाला चारा विकत घेणे शेतकऱ्यांना परवडेना झाले आहे.
बैलबारदाना सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कडबा ,कुटार व पेंडीचे भाव आता गगनाला भिडले आहेत. त्यामुळे उसनवारी करूनच शेतकरी यांत्रिक शेतीला प्राधान्य देताना दिसत आहेत. शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करत शेती करत कुटुंबाचा गाडा हाकत आहे. काही शेतकऱ्यांच्या अंगणात दिसणाऱ्या बैल जोडीची जागा आता ट्रॅक्टर सारख्या यंत्राने घेतली असून नांगरणी, पेरणी,डवरणी , फवारणी व इतर शेती मशागतीची कामे पारंपरिक पद्धतीने करू लागले आहेत. शेतात कष्ट करून पिकांना ‍ म्हणावा तेवढा मोबदला मिळत नाही, त्यामुळे दिवसेंदिवस शेती करणं परवडत नाही असे मुंडवाडा येथील शेतकरी अनिल खेडकर यांनी बोलताना सांगितले.
यामुळे ट्रॅक्टरवरच यांत्रिक शेतीचा केंद्रबिंदू बनत चाललेला आहे. दहा-बारा वर्षापूर्वी ट्रॅक्टरचा वापर हा मर्यादित केला जायचा परंतु आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन काही शेतकरी आधुनिक कास धरू लागला आहे.
डिझेलचे दर गगनाला भिडल्याने ट्रॅक्टरचे भाडे वाढत चाललेले आहेत. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठीचा खर्च दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शेती करताना उसनवारी करावी लागत आहे. सरकारने किमान शेतीच्या कामासाठी कमी दराने डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे .
.............................................
केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत.योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आता अनुदानावर ट्रॅक्टरसह विविध अवजारे व उपकरणे खरेदी करत आहेत.
- पंकज मेटे, सरपंच,
     ग्रा. प.पाळा
  
............................................
शेतात नांगरणीपासून पीक निघेपर्यंत शेतकऱ्यांना पैसा खर्च करावा लागतो. पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांना नांगरणी करून मशागत करून पेरणी करावी लागते प्रत्येक पिकाला काढणीपर्यंत अधिक खर्च येतो. पिक आल्यानंतर योग्य तो भाव मिळत नाही त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्च अधिक अशी परिस्थिती आहे.

: अमोल तिडके
  शेतकरी,खंडाळा (खुर्द )

Comments

Anonymous said…
आपण खरी समस्या मंडळी,सरकारने काहीतरी करायला हवे आपले अभिनंदन

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात