शासकीय कार्यालयातील दूरध्वनी यंत्रणांचा प्रश्न ऐरणीवर.
ग्रामीण भागातील नागरिकांसमोर मोठी समस्या.
भारत संचार निगमची भूमिका ठरणार महत्वाची.
उत्तम ब्राम्हणवाडे.
मागील दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून सुरू झालेल्या मोबाईल यंत्रणेच्या वापरामुळे शासकीय कार्यालयातील असलेले जुने भारत संचार निगमचे लँडलाईन दूरध्वनी क्रमांक अनेक वेळा बंद पडत असल्याने शासकीय कार्यालयात संपर्कासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठे अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र शहरासह विविध विभागातील कार्यालयातून दिसून येत आहे.
यामुळेच शासकीय कार्यालयात एक स्वतंत्रपणे मोबाईल क्रमांक देण्यात येऊन त्याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी नांदगाव खंडेश्वर तालुकावासीयाकडून केली जात आहे. यासंदर्भात नांदगाव खंडेश्वर तहसील कचेरी, नगरपंचायत,टेलिफोन येक्सचेंज, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासह जवळ जवळ सर्वच शासकीय कार्यालयामध्ये आणि नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाच्या ठिकाणी तसेच ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सेवेप्रसंगी नागरिकांना संपर्क साधण्यासाठी अधिकाऱ्यांच्या खासगी नंबरचा वापर करावा लागतो.
अनेक वेळा हे नंबर बंद असल्याने अथवा अत्यावश्यक कामासाठी अधिकारी बाहेर दौऱ्यावर गेल्यास मोबाईल उचलले जात नसल्याने नागरिकांना तातडीने संपर्क होऊ शकत नाही या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनाने या प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वतंत्रपणे दूरध्वनी यंत्रणेची व्यवस्था करावी व ते क्रमांक नागरिकांच्या माहितीस्तव जाहीर करावे अशी मागणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक नागरिकांकडून केली जात आहे.
या संदर्भात बुद्धिजीवी नागरिकांनी स्पष्ट केले की विविध शासकीय कार्यालयातील असलेल्या अधिकाऱ्यांचे नंबर हे खाजगी स्वरूपाचे असल्याने काही वेळा सायंकाळी उशिरा त्यांच्यावर क्रमांक संपर्क साधने अडचणीचे ठरते अशावेळी शासकीय क्रमांकावर संपर्क साधने केव्हाही उचित ठरणार असल्याने शासनाने या गंभीर बाबीचा विचार करावा अशी मागणी केली.यासंदर्भात भारत संचार निगमच्या दूरध्वनी यंत्रणे व संदर्भात नागरिकतून देखील अनेक वेळा ही यंत्रणा बंद असल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील करण्यात आल्या होत्या परंतु याकडे कुणीही लक्ष दिले नाही.यामुळेच भारत संचार निगमने लँडलाईन पद्धतीच्या दूरध्वनी यंत्रणे बरोबरच स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेले सध्याचे हे नंबर मोबाईल स्वरूपात दिल्यास नागरिकांना त्यावर संपर्क साधणे सोयीचे तसेच सुलभ व व सुरक्षित होईल अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संदर्भात निर्माण झालेल्या नवीन समस्येबाबत योग्य कार्यवाही करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
-----------------------------------------------------------------
( चौखट )
संपर्क करणे झाले कठीण
-------------------------------------------------------------------
शासकीय कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठे अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
यामुळेच शासकीय कार्यालयात एक स्वतंत्रपणे मोबाईल क्रमांक देण्यात येऊन त्याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. शासकीय कार्यालयातील असलेल्या अधिकाऱ्यांचे नंबर हे खासगी स्वरूपाचे असल्याने काही वेळा सायंकाळी उशिरा त्यांच्यावर क्रमांक संपर्क साधने अडचणीचे ठरते अशावेळी शासकीय क्रमांकावर संपर्क साधने केव्हाही उचित ठरणार असल्याने शासनाने या बाबीचा विचार करावा .
- प्रशांत वैद्य
भाजपा, कार्यकर्ते.
नांदगाव खंडेश्वर
Comments