यंत्रणांचे नियंत्रणच नसल्याने ग्रामपंचायती रामभरोसे !

गटविकास अधिकारी अपडाऊन करत असल्यामुळे कर्मचाऱ्यावर नियंत्रण राहणार कसे. 

तालुक्याची परिस्थिती झाली अत्यंत बिकट.


उत्तम ब्राम्हणवाडे.
 
  नांदगाव खडेश्वर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालय हे कुलूप बंद राहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. काही मोजक्याच ग्रामपंचायतींचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित असतात, ही तालुक्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे सुद्धा उत्तर नाही. त्यामुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 
 शासन फुकट पगार देतो का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.
कोरोना काळात आठवडा पाच दिवसांचा करण्यात आला होता. तर शनिवारी आणि रविवारी सुट्टी असायची. आता सगळे पूर्वरत झाल्याने सोमवारपासून सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात उपस्थिती तर सुट्टी ६.१५ वाजता असे नियोजन आहे. नागरिकांच्या समस्या सुटाव्यात आणि गावाचा विकास व्हावा, याकरिता २४ तास सेवा देण्याचा शासनाचा मानस आहे.त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. असे असताना सुद्धा अधिकारी-कर्मचारी हे अमरावती वरून दररोज ये-जा करतात. याची तक्रार कुणी करण्यासाठी पुढाकार केल्यास त्याला कलम ३५३ सारख्या गुन्ह्यांत अडकविण्याची
भीतीसुद्धा दाखविली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. तालुक्यात ६८ ग्रामपंचायती आहेत. त्यात ३९ ग्रामसेवक तर ५ ग्रामविकास अधिकारी आहेत. कार्यालयात परिचर, पाणी वाटप कर्मचारी, विद्युत चालू व बंद करणारा कर्मचारी, संगणक चालक असे विविध पदे असतात. एकंदरीत एका ग्रामपंचायत कार्यालयात ३ कर्मचाऱ्यांचे पद पकडले तर तालुक्यात २०४ कर्मचारी, ३९ ग्रामसेवक व ५ ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पद आहेत. एकूण २४८ अधिकारी व कर्मचारी ३९ ग्रामपंचायत कार्यालयात काम करतात. अंदाजे एका ग्रामसेवकाला ५० हजार रुपये पगार पकडला आणि एका ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्याला १० हजार रुपये असा पगार पकडला तर
तालुक्यातील २४८ कर्मचाऱ्यांना दरमहा १४ लाख ८८० हजार रुपये ऐवढा पगार फक्त ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वाटप केला जातो. ऐवढेच नव्हे ईतर भत्त्यासह , घर भाडे सुद्धा वेगळे मिळते. असे असले तरी कुणी मुख्यालयात राहत नाही. मात्र, कागदावर राहत असल्याचे अनेक उदाहरण आहेत, हे विशेष ! शासनाने कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ वाढवून दिली आहे. सकाळी ९.३० वाजता कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश असताना देखील कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाही. तर काहीवेळा कार्यालयच कुलूपबंद असतात. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी अमरावती,यवतमाळ,नेर परसोपंत,चांदुर रेल्वे,धामणगाव रेल्वे,बडनेरा यासह अन्य ठिकाणावरून दररोज ये-जा करतात. राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. शनिवार व रविवारी सुट्टी असते. इतर दिवस कामाचे असतात. मात्र, कर्मचारी हे शुक्रवार पासूनच सुट्ट्यांचा लाभ घेतात. काही वेळा कार्यालयालाच कुलूप लावल्याचे चित्र पहावयास मिळते. या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी व पंचायत विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीकडे लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात हलचल रजिस्टर ठेवणे आवश्यक आहे. असे असतानाही एखाद्याच कार्यालयात हे रजिस्टर पाहवयास मिळते. या रजिस्टरमध्ये अधिकाऱ्यांच्या हालचालीची नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून अधिकारी कुठे फिरकला याची माहिती नागरिकांना मिळते. मात्र, याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.
एवढेच नाही तर यावर नियंत्रण ठेवणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सुद्धा दररोज यवतमाळ वरून अपडाऊन करतात त्यामुळे गटविकास अधिकारी यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहणार कुठून ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
----------------------------------------

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात