मंगरूळ (चव्हाळा) येथे खुलेआमपणे अवैध वाळू उपसा सुरू.
महसूल प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग.
तलाठ्यांकडून कार्येवाही शून्य.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वच नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या आणि रात्रीला सुद्धा अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे तालुक्यातील मंगरूळ (चव्हाळा) आणि हरणी या ठिकाणी वाळूचा उपसा सुरू आहे महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून खुलेआंम पने अवैध रेतीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे उपसा करून गावाजवळ अनेकानी रेतीचा साठा साठवुन ठेवला आहे दररोज मध्यरात्री 2 ट्रॅक्टरच्या साह्याने आणि 15 ते 20 मजूर हे नदीच्या आत जाऊन दिवसाला उपसा करतात आणि हा सर्व प्रकार तलाठ्यांच्या डोळ्यासमोर होत असून तलाठी हे कोणत्याही रेती तस्कर यांचेवर कार्येवाही करीत नसल्याने दोन्ही प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्याच प्रमाणे तालुक्यातील मंगरूळ (चव्हाळा) येथील साखळी नदीच्या पात्रातून रात्रभर चोरटे हे वाळूची चोरी करुन वाळू विकण्याचे काम करीत आहेत यामध्ये काही ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून हा सर्व प्रकार तेथील तलाठ्यांना माहिती असूनही त्यांच्याकडून कुणावरही कार्यवाही होत नसल्याचा आरोप मंगरूळ व हरणी या गावातील नागरिकांनी लावला आहे आणि याचा त्रास मात्र या नदीपात्रा जवळ असलेल्या शेतकऱ्यांना होत आहे शेतकऱ्याच्या शेतातून रेतीची चोरी करणारे आपली वाहने नेत असून शेतकऱ्याच्या पिकाची नासाडी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.याबाबत नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार यांना गावातील काही नागरिकांनी सूचना दिल्यावरही त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कार्येवाही करण्यात येत नसल्याचा आरोप मंगरूळ (चव्हाळा) येथील नागरिकांनी लावला आहे.कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा मंगरूळ येथील ग्रामस्तानी दिला आहे.
Comments