खाजगी शाळांची मनमानी.
पालकांची वाढली चिंता !
फी भरता भरता पालकांच्या नाकी नऊ
उत्तम ब्राम्हणवाडे.
प्रत्येक सामान्य आई-वडिलांचे एक स्वप्न असते की आपला मुलगा मोठ्या प्रशस्त शाळेमध्ये शिकावा परंतु या स्वप्नाच्या नादात अनेक पालकांना डोके धरून बसण्याची वेळ येत आहे.तालुक्यातील खाजगी शाळांची प्रचंड फी वाढ आणि विद्याथ्यांमध्ये झालेला भ्रमनिरास यातून पालकांची अवस्था ही घरका ना घाट का अशीच होत असतानाची चित्र दिसत आहे.पूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण अगदी बालवाडीपासूनच दिले जायचं परंतु जिल्हा परिषद शाळेचा मध्यंतरीच्या कालावधीत घसरलेला दर्जा सावरत असताना मात्र पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये घालण्याचे फॅड डोक्यामध्ये शिरले आणि सामान्य पासून तर रोजगार कामगार व्यापारी नोकरदार ह्या सगळ्यांनाच आपल्या मुलांना इंग्रजी शाळेच्या माध्यमातून शाळेमध्ये शिकवणीसाठी पाठवण्याची जनु स्पर्धाच निर्माण झाले. परंतु हल्लीच्या काळात खाजगी शाळेतील भरमसाठ वाढणाऱ्या फी चा प्रश्न मात्र अत्यंत पालकांसाठी प्रतिष्ठेचा आणि डोकेदुखीचा बनलेला आहे.नांदगाव खडेश्वर तालुक्यातील किंवा अमरावती जिल्ह्यातील मोठ्या प्रशस्त सुसज्ज इमारती असलेल्या व पूर्ण सुख सोयींनी अनुकूल असलेल्या शाळेमध्ये आपल्या मुलाचे ऍडमिशन होण्यासाठी पालक एकीकडे लाखो रुपये मोजत असताना त्याच शाळेमध्ये
दर्जाहीन शिक्षण शिकवल्या जात असल्याचे तब्बल ३६५ दिवस उलटल्यानंतर पालकांच्या लक्षात येत आहे. शाळेतील वर्षभरात होणारे मोठे इव्हेंट त्या इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी लागणारे हजारो रुपये फीस आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म , शूज , पुस्तके या आणि अशा प्रकारचा अनेक छुपा खर्च पालकांच्या माथी मारत असताना मात्र या सगळ्या फीस भरत असताना सामान्य पालकांना नाकी नऊ येत आहेत . याबद्दल शासनाचे ठोस असे कुठलेही धोरण नसून खाजगी शाळांच्या मनमानी मात्र सगळीकडे होत असताना दिसत आहे.शिक्षणाच्या नावाखाली दर्जेदार फक्त शब्द वापरून सामान्य पालकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम या खाजगी शाळा करत आहेत का ? असाही सूर पालकातून बोलल्या जात आहे. या खाजगी शाळांमध्ये शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांच्या पदव्या विषयी सुद्धा पालकातून शंका व्यक्त केली जात आहे . अनेक खाजगी शाळेमध्ये दहावी बारावी पास असणाऱ्या उच्च विद्या विभूषित बेरोजगार युवकाकडून शिकवण्या घेतल्या जात असल्याचेही चित्र समोर येत आहे . परंतु दुसरीकडे सुविधा नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना घालण्यासाठी पालक धजावत नाहीत .आर्थिक झळ सोसून सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच विद्यार्थ्याचे पुढचे शिक्षण देण्यासाठी पालकांची पसंती असली , तरीही वाढत असलेल्या फी मात्र पालकांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.
गोरगरिब सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे परंतु खाजगी शाळांकडून भरमसाठ फी आकारली जात असल्याने एव्हढे महागडे शिक्षण घ्यायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला असून शाळेची लोकप्रियता वाढली की फि वाढ नित्याचीत होत आहे ही बाब खेदजनक बनत आहे वाढत्या प्रवेश फि बाबतीत तालुका शिक्षण विभाग काय भूमिका घेईल याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
Comments