सरपंच सचिवाची मनमानी ठरली फुबगावच्या विकासाची संपूर्ण हानी.

विकासापासून रोखणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध लढा देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार.

उत्तम ब्राम्हणवाडे.

येथील सरपंच शोभाताई ढवळे व सचिव योगिता चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळे फुबगावचा विकास ठप्प झाला असून गावकऱ्यांची संपूर्ण कामे थंड बस्त्यात पडली असल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे घरकुलाची कामे, सिंचन विहिरीच्या लाभार्थ्यांचे प्रश्न, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न, प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न, पाणीपुरवठ्याची व्यवस्था, वीजपुरवठ्याचा प्रश्न असे एक ना अनेक प्रश्न ठप्प पडले आहेत. गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आहे की नाही?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. श्रेयवाद व आर्थिक हितसंबंधाचा न्यूनगंड पराकोटीला पोहोचला आहे. अनेक निर्णयापासून ग्रामपंचायत सदस्य अनभिज्ञ असल्याच्या तक्रारी आहेत. कोणत्याही गावाचा विकास करायचा असेल तर त्यामध्ये राजकारण आणू नये अशी भूमिका घेणाऱ्या गावातच विकास होत असतो. गावासाठी सर्वांनी राजकारण सोडून एकत्र आले पाहिजे हा विशाल दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे; मात्र काही स्वार्थी व अज्ञानी टोळीकडून या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. गावामध्ये मताच्या राजकारणासाठी काही कुरापतखोर लोक जाणीवपूर्वक लोकांमध्ये फूट पाडून भांडणे लावण्याचे कारस्थान रचत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामपंचायत सचिव योगिता चव्हाण यांच्या कारभाराविरुद्ध गावकऱ्यांनी यापूर्वी उपोषण व आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी देखील झाली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली नाही.  फुबगाव येथील अनेक बांधकाम कामगारांना गेल्या दोन वर्षापासून प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्यांना सर्व लाभापासून सचिवांनी वंचित ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

येथील सरपंच शोभाताई ढवळे हे ज्यांच्या पाठबळावर निवडून आल्या त्यांचीच त्यांनी साथ सोडल्याची गावात चर्चा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांमध्ये प्रचंड संतोष असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचा परिपाक राजकीय स्थित्यंतरात येऊ शकतो अशी गावात चर्चा आहे. गावाला विकासापासून रोखणाऱ्या सर्व प्रवृत्तींचा प्रतिकार करण्याचा व त्याविरोधात लढा देण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात