दोन महिन्यांपूर्वी डांबरीकरण झालेला रस्ता पूर्ण उखडला.
एक किलोमीटरचे डांबर चोरी गेले की काय?
शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ (चव्हाळा) ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शहापूर ते खेकडी या एक किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने किंमत १९,३४,८५१ रुपयाचा निधी मंजूर केला होता. त्यामधून शेतकऱ्यांना शहापूर ते खेकडी अस्या एक किलोमीटर रस्त्याचे मागील वर्षी डांबरीकरण करण्यात आले आहे परंतु त्या डांबरीकरणाचे डांबर हे चोरीला गेले की काय ?असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे त्या रस्त्यावरून जात असताना शेतकऱ्याला बैलबंडी शेतात नेताना चांगली कसरत करावी लागते त्या डांबरीकरण रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झाली आहे आणि या रस्त्यावर एक किलोमीटर पर्यंत मोठं मोठया गिट्टी वर आलेल्या आहेत आणि जागो जागी खड्डे पडले आहे तसेच या रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे त्यामुळे पावसाळ्यापूर्वी त्या रस्त्याचे काम त्वरित करावे आणि ठेकेदारावर योग्य कार्यवाही करावी अशी मागणी मंगरूळ (चव्हाळा)येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या रस्त्याचे काम हे गेल्या दोन महिन्यापूर्वीच करण्यात आले असून दोन महिन्यात या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने ठेकेदाराने हे काम केले की नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कार्येवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Comments