जिल्हा भरारी पथकाची नांदगाव खंडेश्वर येथे धडक कार्यवाही.
अनधिकृतरीत्या साठविलेले ६०० पोते खत जप्त.
जितेन रमनिकलाल वछानी विरुद्ध गुन्हा दाखल.
उत्तम ब्राम्हणवाडे.
दिनांक 21/6/ 2023 रोजी कृषी विकास अधिकारी जी.टी. देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक आणि नांदगाव खंडेश्वर येथील तालुका भरारी पथक यांच्या संयुक्त कार्येवाही मध्ये नांदगाव खंडेश्वर येथील पद्मपाणि मंगलम मधील खोल्यांमध्ये अनधिकृतपणे साठवणूक केलेल्या मे.जेनिक केमटेक कार्पोरेशन अंकलवाडी गुजरात या कंपनीच्या अनाधिकृत खतांचे 600 पोते किँमत अंदाजे सहा लक्ष रुपये रकमेचा साठा जप्त करून संबंधित कंपनीविरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईच्या वेळी जी.टी.देशमुख (कृषी विकास अधिकारी) अजय तळेगावकर (जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती)एल.जी.आडे (मोहीम अधिकारी) दादासो पवार (जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक) लक्ष्मण खांडरे (कृषी अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर) अनिल वानखडे (तालुका कृषी अधिकारी ) घुगे (विस्तार अधिकारी) हे उपस्थित होते.
जेनिक केमटेक कार्पोरेशन सर्वे नंबर 290 /१ अंकलवाडी,स्टॅन्ड जवळ,वसाड डाकोर रोड, अंकलवाडी. गुजरात या कंपनीच्या खताच्या गोण्या बायोनिक बायो एनपीके कॅरियर बेस्ट कन्सोरशिया 310 गोण्या व टायसन प्रीमियम दाणेदार उर्वरक 290 गोण्या अशा एकूण सहाशे गोण्या नांदगाव खंडेश्वर येथील पद्मपाणि मंगलम येथून दिनांक 21. 6 .2023 रोजी आरोपीने साठवणुकीचा परवाना नसताना खत साठवणूक करणे शासन मान्यता नसताना व निकृष्ट खत उत्पादन व वाहतूक करणे खताच्या गोण्यावर गट क्रमांक उत्पादन महिना वर्ष व विक्री किंमत न लिहिता वाहतूक व विक्री करणे व साठवणूक करणे व निर्धारित मानकाचे नसलेले खत शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी आणणे या कारणासाठी खत जप्त करण्यात आलेले आहे
सदर जप्त केलेल्या मालाची किंमत 524 500 इतकी होते.
त्यासाठी म्हणून कंपनीसाठी जबाबदार असलेला व्यक्ती तथा त्याचा भागीदार जितेन रामनिकलाल वच्छानी ,लांबवेल रोड अपोजिट लांबेल हनुमान टेम्पल लांबेल आनंद गुजरात त्याला अपराध बद्दल आरोपी बनविण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला , माल तालुका बीज गुणन प्रक्षेत्र धानोरा (गुरव) येथे ठेवण्यात आलेला असून
Comments