रस्त्यासाठी नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक.
चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा.
उत्तम ब्राम्हणवाडे.
तालुक्यातील शिरपूर ते पारधी बेडा रस्ता सन 2013 मध्ये तयार करण्यात आला होता. सादर रस्ता होऊन आज जवळपास दहा वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे.सादर रस्त्यावर आज चारचाकी,दुचाकी व पायदळ चालणे देखील दुरापास्त झाले आहे. सादर बेड्यावर पूर्ण पारधी लोकवस्ती आहे. याबाबत येथील नागरिकांनी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संबंधित प्रशासनाला वेळोवेळी अवगत केले असता, यावर काहीही उपाय योजना होताना निर्दशनास येत नाही.हे प्रशासन झोपेचे सोंग घेत असून ग्रामस्थांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे येथील नागरिकांना या बाबीचा प्रचंड त्रास होत आहे. रस्त्याचे अवस्था बिकट असल्याकारणाने नागरिकांना मृत्यूच्या आहिरे जावे लागत आहे. रस्त्याची अवस्था बिकट असल्याकारणाने दररोज अपघाताला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावरचे संपूर्ण डांबर गेले असून रस्त्यात संपूर्णपणे खड्डे पडले आहे. तरी सादर रस्ता नव्याने चांगल्या स्थितीत तयार करून देण्यात यावा याकरिता शिरपूर येथील नागरिकांनी तहसील कार्यालय येथे धडक दिली. तसेच ओम मोरे व राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी, श्रवण पुसदकर, प्रेमचंद पवार, माधुरी भोसले,नुरासिंग भोसले, अविनाश चव्हाण, शुभांगी पवार, सोपान भोसले, शरद पवार, सुनील भोसले,शिंदे पवार,रामा पवार,निशांत पवार,सुरेश पवार, निकेश भोसले, इ.नागरिक उपस्थित होते.
-------------------------------------
रस्त्याचे अवस्था बिकट असल्याने,खूप वेळा अपघाताच्या आहारी जावे लागतात. व खूपदा गरोदर महिलांना रुग्णालय येथे नेत असताना रस्त्या ंच्या अवस्तीमुळे डिलेवरी सुद्धा रस्त्यावरच होत आहे.
Comments