वाघोडा येथील घरकुल व घर बांधकाम करणाऱ्या नागरिकांची तहसील कार्यालय मध्ये धडक.
तहसीलदार यांना दिले निवेदन.
घरकुल बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध करून देण्याची केली मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
आज ( दिं. १६ रोजी ) तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्र्वर येथे वाघोडा या गावातील घरकुल बांधकाम साठी व घर बांधकामा साठी,रेती उपलब्ध करून गावातील, गरीब गावकरी यांना मा.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी घरकुल धारक यांना 5 ब्रास रेती मोफत व घर बांधकाम करणाऱ्यांसाठी 600 रु ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध करून देणार आहे असे सांगण्यात आले होते.त्या प्रमाणे आपण आम्हाला रेती उपलब्ध करून द्यावी.रेती उपलब्ध नसल्यामुळे घराचे काम, घरकुलाची बांधकाम रखळलेले गेलेले आहे, त्यामुळे पंचायत समिती येथील अधिकारी यांनी आम्हाला नोटीस पाठवून बांधकाम न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची नोटीसीस बजावलेली आहे, तरी आपण आम्हाला त्वरित रेती उपलब्ध करून द्यावी ही विनंती,आम्ही कसेतरी नाल्यामधून इकडून तिकडून रेती कशी बशी जमा करून ,काही प्रमाणात दस्त जमा करून घरकुलाचे व घरांचे बांधकाम चालू केलेले आहे,काल व परवा तुमच्या महसूल मंडळाचे अधिकारी मार्तंड ,प्रवीण रावेकर तलाठी,आणि कोतवाल बसवनाथे, पटवारी फुटाणे हे आमच्या घरी येऊन आमच्या घरासमोर रितीचे पंचनामे करून गेले हे कितपत योग्य आहे तरी आपण आम्हाला डेपो पद्धत प्रमाणे 600 प्रमाणे 5 ब्रास मोफत देण्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलेले आहे तरी आपण आम्हाला 5 ब्रास मोफत वाळू तरी आपण आम्हाला मोफत घरकूल बांधकाम व घर बांधकाम करणाऱ्याला डेपो पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी ही विनंती करण्यात आली तेव्हा वाघोडा गावातील घरकुल बांधकाम करणारे लीलाधर सुलताने,सुनील गावणर,एकनाथ ठाकरे,एकनाथ मेटकर,तुकाराम भलावी, संजय भगत, संतोष बागडे,गजानन सुलताने,प्रतिक गावणर,रोहन तुमदाम व इतर घरबंधकाम करणारे गावकरी यावेळी हजर होते.
Comments