नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते गजानन नगरी शेगावला दाखल होणार.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते गजानन नगरी शेगावला दाखल होणार.
उत्तम ब्राम्हणवाडे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीची नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या ठिकाणी दिनांक 27/5 /23 बैठक झाली. या बैठकीत शेगावला संत गजानन महाराजांना साकडे व विदर्भ आक्रोश मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याच्या दृष्टीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत विदर्भ आक्रोश मेळाव्यात गावागावातील नागरिकांना सहभागी होण्याकरीता आव्हान करण्यात येईल असे ठरले. बैठकीनंतर नांदगाव खंडेश्वर शहरातील प्रत्येक दुकानात प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार लिखित "उजडे गावोंका अशांत प्रदेश विदर्भ "पुस्तिकाचे वितरण करण्यात आले. तसेच पत्रके देऊन १ जून रोजीशेगावला होणाऱ्या मेळाव्यात येण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर, तालुका अध्यक्ष दिनेश ढवस, विभागीय अध्यक्ष अशोकराव हांडे ,जिल्हा उपाध्यक्ष दिनकरराव निस्ताने ,शहराध्यक्ष विलास धांडे ,विजय राऊत , रमेशराव देशमुख, कुलदीप वानखडे ,संदीप खंडारे, विजय थोरात, रमेशराव उघडे ,सुरेश बिजवे ,सुशीलकुमार येवतीकर उपस्थित होते.
Comments
💐💐