करूणाताई चवाळे व कल्पनाताई तांदुळकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार.
करूणाताई चवाळे व कल्पनाताई तांदुळकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार.
उत्तम ब्राम्हणवाडे.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, अशा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या दिवशी 31 मे ला दोन महिलांना महाराष्ट्र शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संबंधीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला आहे.
मंगरूळ चवाळा ग्रामपंचायत च्या वतिने महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव संवेदनशीलता व तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ज्यामध्ये सौ. करूणाताई मनोजराव चवाळे व कु. कल्पनाताई तांदुळकर या दोन महिलांना प्रामुख्याने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दोन्ही महिलांनी स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. स्वतः चौकटीबाहेर जाऊन सामाजिक क्षेत्रात वावरत इतर महिलांनाही उत्स्फूर्तपणे सहभागी करण्यात यांचा मोलाचा वाटा आहे. करुणाताई चवाळे या महिला स्वयंसहाय्यता बचत गट मध्ये सक्रिय असून बॅंक सखी म्हणून सुद्धा कार्यरत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महिलांशी निगडित विविध क्षेत्रामध्ये काम केले. कल्पनाताई तांदुळकर यांनी दारुबंदी साठी उभारलेला लढा कौतुकास्पद असून स्त्रियांच्या घरगुती हिंसाचाराचे मुळ दारु व इतर व्यसने असून त्यावर कायदेशीर प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाचा लढा उभारला. सौ. करुणाताई चवाळे व कल्पनाताई तांदुळकर या दोन कर्तबगार महिलांना गौरव चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व रु. 500 ची धनादेश देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सौ. जयश्रीताई गजानन ठवकर व श्रीमती मिराताई राजेंद्र साबळे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आणि सौ. अलकाताई नरेंद्र अंबोरे, सौ. रंजनाताई गजानन गावनेर, सौ. मायाताई प्रणाम सोनोने, श्रीमती गंगाबाई मधुकर शिरभाते, सौ. अर्चनाताई श्रीराम राणे, श्रीमती कमलाबाई उत्तमराव सोनोने यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी मनोज गावनेर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व वर्तमान परिस्थितीत त्यांचा आदर्श स्पष्ट करुन सांगितला. ग्रामसेवक रतिभानजी रबडे यांनी यांनी पुरस्काराची रूपरेषा सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच निलेशभाऊ निंबर्ते, उपसरपंच सौ. शोभाताई चवाळे, ग्रामपंचायत सदस्य सौ. अश्विनीताई चवाळे, अतुलभाऊ ठाकुर, राजेशभाऊ पारधी आणि उमेश गावनेर, मतिन पठाण, प्रगती तांबडे व अंगणवाडी सेविका, आशासेविका व इतर गावातील महिला उपस्थित होत्या.
Comments