रामराव भोयर विद्यालय नांदगांव खंडे. च्या एस. एस.सी. परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

रामराव भोयर विद्यालय नांदगांव खंडे. च्या एस. एस.सी. परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम. 

उत्तम ब्राम्हणवाडे.


 स्थानीक नांदगांव खंडे. येथील मराठा शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित रामराव भोयर विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एस. एस.सी. परीक्षे मधे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असून विद्यालयाचा निकाल ९२% लागला आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमातून विद्यालया च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या वर्षी एकूण 75 विद्यार्थी बोर्ड परीक्षेला बसले होते त्यापैकी 14 विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त श्रेणीमध्ये आले आहे तसेच 26 विद्यार्थी प्रथम श्रेणी मधे आले असून या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळवले आहे.त्यामधून विद्यालयातून प्रथम क्रमंकावर कु. दिशा ढा कुलकर हिला 86% व चि. यश मेश्राम 86% मिळवत या दोघांनी यश संपादन केले आहे. द्वितीय क्रांकाचा मान कू. श्रद्धा उडबगले हिणे 84.60% प्राप्त करून मिळविला. तसेच कु. ईश्वरी सावादे 84.40, कुं.ऋतुजा तीलग्रम 84.40%, कु. रुचिका कुलकर्णी 83.20%, विराग देशमुख 82.40%, कार्तिक पोफळे 82.20%, कु. रुद्राक्षी मोरे 82.20%, कु. तनश्री मोरे 82% गुण मिळवून विद्यालया ला नावलौकिक मिळवून दिले आहे. मराठा शिक्षण संस्थेचे सचिव माननीय डॉ. श्री अमोल भाऊ भोयर, उपाध्यक्ष मा. श्री आकशभाऊ भोयर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री घोरपडे सर तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. व सर्व विद्यार्थ्यांन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आशिर्वाद दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक व शिक्षक वृंद यांना दिले आहे. त्यामुळे विद्यालयामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात