मंदिर पाडून घराचे बांधकाम सुरु.
मंगरूळ चव्हाळा येथील प्रकार.
ग्रामपंचायतीचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष.
उत्तम ब्राम्हणवाडे.
तालुक्यातील मंगरूळ (चवाळा) येथिल वार्ड नं २ मधील लहान महादेव मंदिर शेजारी बांधकाम सुरु आहे परंतु त्याचा त्रास शेजारी असलेल्या मंदिर व घरांना होत आहे ग्रामपंचायतला दान केलेल्या मंदिराच्या समोर १० x १० खोलिचे बांधकाम समोर आले असून आपल्या घरातील सांडपाणी मंदिराच्या पायरी पाशी काढण्यात आले असून व वरील बांधकाम करण्यास अडचण येत असता मंदिराचा स्लॅप देखील फोडला जात आहे तरी देखील ग्रामपंचायत झोपी गेली आहे नाही कोणी बोलत आहे आणी ज्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना दाबण्यात येत आहे शेजारी श्री शिंगणजुळे यांचे घर असून त्यांच्या घरासमोर बांधकाम सुरु आहे त्यांनी ग्रामपंचायत ला माहिती दिली असता सदर बांधकाम करणारे यांनी सांगितले की मी फक्त समोर झडपी काढत आहे म्हणून सांगितले व आता काही दिवसाच्या होत्याच नव्हतं झाल झडपी सोडा समोर वेगळेच चित्र उभ राहील आहे लोक मंदिरासाठी जागा दान देतात येथे तर मंदिर पाडण्यात येत आहे तरी देखील श्री पंचबुद्धे यांना ग्रामपंचायत तर हात नाही बांधकाम करण्यात कारण समोरच्या व्यक्तीकडे ग्रामपंचायत कार्यालय येथे जागेचे कागदपत्रे जमा करायला सांगितले होते पण त्यांनी कोणतेही कागदपत्रे सादर केली नाही वा बांधकाम करण्याची कोणतेही परवानगी ग्रामपंचायत कडून घेतली नाही तरी देखील अतिक्रमण मध्ये बांधकाम सुरु आहे याला जबाबदार कोण असे गावकरी विचार करत आहे.
Comments