नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार भुसारी यांचा अजब कारभार.
रेतीचे डेपो सुरू न करता घरकुल लाभार्थ्यांच्या रेतीचेे केले पंचनामे!
उत्तम ब्राम्हणवाडे.
सरकारी घरकुल बांधकाम करण्यासाठी पंचायत समिती वतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घरकुल धारकाना गटविकास अधिकारी यांचे कडून नोटीसा बजावल्या आल्या आहेत त्यामध्ये म्हंटले आहे की, घरकुल बांधकाम त्वरित सुरू न केल्यास त्या लाभार्थ्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि त्यांचे मंजूर घरकुल रद्द करण्यात येईल परंतु घरकुल लाभार्थ्यांना तालुक्यात रेतीच उपलब्ध नसल्यामुळे घरकुल बांधकामास विलंब होत आहे म्हणून त्या लाभार्थ्यांवर सरकारी अधिकाऱ्यांनी घरकुल लाभार्थ्यांना नोटीसा बजावल्या असून घरकुल बांधकाम न केल्यास गुन्हा दाखल करू असे त्या बजावण्यात आलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे त्या भीतीने घरकुल लाभार्थ्यांनी कशी बशी जुडवा जुडवा करून रेती उपलब्ध करून घेतली असून घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे असे असताना देखील त्या घरकुल लाभार्थ्यांवर नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार हे हेतू परस्पर दंडाची कार्यवाही करीत आहेत. घरकुलाचे काम सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांच्या घरासमोर रेती साठवून ठेवण्यात आली आहे त्यामुळे दीड tebदोन ब्राचे रेतीचे पंचनामे मंडळ अधिकारी तलाठी यांच्यामार्फत करण्यात येत आहे, कार्यवाही करण्यात आलेल्या घरकुल लाभार्थ्यांमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा येथील घरकुलधारकांचा समावेश आहे हे पंचनामे करण्यात येत असल्यामुळे गरीब घरकुल लाभार्थ्यावर विनाकारण दंडात्मक कारवाई तहसील कार्यालयाची वतीने करण्यात येत आहे हा एक प्रकारचा अन्याय असल्याचे वाघोडा येथील घरकुल लाभार्थ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे ज्या घरकुल लाभार्थ्यांवर तहसील कार्यालयाच्या वतीने दंडात्मक कार्य करण्यात आली त्यामध्ये वाघोडा येथील घरकुल लाभार्थी
पिंटू, लीलाधर सुलताने,सुनील गावणार, देवराव मेटकर, संजय भगत,प्रफुल कांबळे,विलास इंगोले,अक्षय तायडे,सचिन ठाकरे,ओंकार पाखरे,लक्ष्मण पाखरे, यांचा समावेश आहे.त्याच प्रमाणे वाघोडा गावामध्ये इतरही घरांचे बांधकाम सुरू असलेल्या बांधकामाचे पंचनामे मंडळ अधिकारी आणि तलाठी करीत आहेत आहेत, गावामध्ये बांधकाम चालू असलेले अन्य घरकुलधारक यांच्या घराजवळील रेती पंचनामे करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती गावकऱ्यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे महसूल प्रशासनाविषयी गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण दिसून येत आहे. हा एक प्रकारचा शासकीय अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांवर अन्याय असल्याचे गावकऱ्यांनी प्रसिद्धि पत्रकानवये म्हटले आहे.हा शेतकरी आणि गोरगरीबावरच अन्याय का ? रात्रीला नांदगाव खंडे मध्ये अवैध रेतीचे ट्रक येतात त्यांच्यावर यांची नियंत्रण का नाही,त्यांना यांचे हप्ते मिळतात का? असा संतप्त प्रश्न वाघोडा येथील घरकुल लाभार्थी यांनी उपस्थित केला आहे.
Comments