विद्युत विभागाच्या पापळ आणि धानोरा येथील अभियंत्याचा मनमानी कारभार.

 वीज ग्राहकांशी अधिकारी वागतात अरेरावीने.

 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी.

उत्तम ब्राम्हणवाडे.

 विद्युत वितरण कंपनीच्या नांदगाव खंडेश्वर येथील उपविभागातील शहर ग्रामीण भागातील पापळ आणि धानोरा ( गुरव ) वितरण केंद्र येथील येथील कार्यरत असलेले अभियते हे सकाळी कार्यालयात उशिरा पोहचतात तर कधी कधी हजरच नसतात तसेच लोप्रतिनिधी व विजग्राहक यांनी कॉल केले असता वसुलीवर आहे असे सांगितल्या जाते परंतु प्रत्यक्ष लाईनमन हेच वसुली करतात व लाईन सुरळीत सुरू राहावी याकडे सुद्धा लक्ष्य देतात परंतु लाख रुपये पगार असणारे अभियंते हे आपल्या कार्यक्षेत्रात हजरच नसतात हे सत्य आहे आणि अशा अभियंत्यांची पाठराखण नांदगाव खडेश्वर येथील उपकार्यकारी अभियंता पद्माकर पाटील करत असल्याचे नेहमी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात विद्युत विभागाच्या अधिकाऱ्या विषयी तीव्र संताप वीज ग्राहकांना दिसून येत आहे. उपकार्यकारी अभियंता सारख्या महत्वाचे पदावर असताना अशा चुकीच्या गोष्टीची बाजू नेहमी उपअभियंता घेत असतात आणि त्यावर त्यांना विचारणा केली असता ते व्यवस्थित उत्तर देत नाहीत उडवा उडवीचे उत्तरे देतात विजग्राहक हा कंपनीसाठी महत्वाचा आहे विजग्राहक हा देवच आहे असही मानायला हरकत नाही त्यामुळे उपकार्यकारी अभियंता यांनी विजग्राहकाशी व्यवस्थित वागावे व अपशब्द बोलू नये तसेच आपले अधिनस्थ अधिकारी यांना कार्यालयात हजर राहण्याचे व वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी सागावे बऱ्याच दिवसापासून नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे तालुक्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती उदभवलेली आहे शाळकरी मुलाची उन्हाळी परीक्षा सुद्धा अशा परिस्थितीत मुलांनाअंधारातच द्यावी लागली ही खेदाची बाब आहे यावर लक्ष्य मुख्य अभियंता,आणि अधिक्षक अभियंता यांनी लक्ष देऊन अशा बेजबाबदार अभियंत्यावर रीतसर कार्यवाही करावी अशी मागणी विजग्राहक आणि शेतकरी यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात