शासकीय आय टी आय नांदगाव येथे प्रवेशोत्सव.
शासकीय आय टी आय नांदगाव येथे प्रवेशोत्सव.
उत्तम ब्राम्हणवाडे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव खंडेश्वर येथे दिनांक 20 जून 2023 रोजी संस्थेच्या वतीने प्रवेशोत्सव 2023 व तालुक्यातील महिला सरपंच यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य श्री एन ए भुकवाल हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हास्तरीय स्पर्धेत स्मार्ट ग्राम पंचायतच्या प्रथम पुरस्कार प्राप्त पिंपरी निपाणी च्या सरपंच सौ योगिताताई विशाल रिठे तसेच वेणी गणेशपूर च्या सरपंच सौ मोनिकाताई कराळे या होत्या
सदर प्रवेशोत्सव कार्यक्रमांमध्ये संस्थेचे 2023 सत्रातील प्रवेशासाठी उपलब्ध असलेले व्यवसाय याबद्दल उपस्थित तालुक्यातील महिला सरपंचांना माहिती देण्यात आली.
ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रशिक्षण देण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून चालते या प्रशिक्षणाचे बळावर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे सत्र ऑगस्ट 2023 पासून प्रवेशित विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल सोबतच प्रशिक्षणादरम्यान संस्थेच्या वतीने नामांकित कारखान्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन प्राचार्य श्री एन ए भुकवाल यांनी केले.
याप्रसंगी संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांचे वतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू व आर्टिकल यांचे प्रदर्शनीला उपस्थित सर्व महिला सरपंच यांनी भेट दिली
संस्थेच्या वतीने उपस्थित सर्व महिला सरपंच यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला
उपस्थित सर्व महिला सरपंचा यांना कॉस्मेटोलॉजी या व्यवसायातील प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींनी प्रत्यक्ष सौंदर्यप्रसाधनाचे प्रात्यक्षिक दाखविले त्याचप्रमाणे फॅशन डिझायनिंग अँड टेक्नॉलॉजी या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर डिझायनर ड्रेसचे सोबतच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इमिटेशन ज्वेलरी चे अवलोकन कार्यक्रमा करिता उपस्थित महिला सरपंच यांनी केले. सदर कार्यक्रमाकरिता संस्थेच्या महिला निदेशक पेंढारकर मॅडम बिबेकर मॅडम लोखंडे मॅडम वसुले मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्व महिला सरपंचांना संस्था भेटीसाठी आमंत्रित करून भेटीदरम्यान विविध व्यवसायातील प्रात्यक्षिकांचे अवलोकन करण्याची संधी संस्थेच्या वतीने देण्यात आली.
याप्रसंगी तालुक्यातील सौ.वैशाली सव्वालाखे,सौ अमृता जेठे, सौ प्रतिभा मोहोड,सौ नीलिमा थोरात सौ शोभाताई ढवळे, यांचेसह आदर्श ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री विशाल रिठे व श्री निलेश कराळे यांची उपस्थिती होती.
Comments