रेनुकापुर ते नांदगाव खंडेश्वर विद्युत वाहिनीचे काम अत्यंत संथगतीने.
कंत्राटदाराचे कामावर लक्षच नाही.
विद्युत विभागाचे अधिकारी लक्ष देतील काय ? शेतकऱ्यांचा सवाल.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर शहराला पावसाळ्याच्या काळात अंधारमय होण्यापासून वाचविण्याकरिता नेर परसोपत तालुक्यातील रेणुकापुर येथून नांदगाव खंडेश्वर शहरापर्यंत ३३ के.वी.विद्युत हायटेन्शन लाईन ओढण्याचे काम हे मंजूर करण्यात आले आहे हे काम ३ कोटी ५०लाखाचे असून हे काम परतवाडा येथील स्वरसदा इलेक्ट्रिकल्स या कंपनीला देण्यात आले आहे या कामाचा कालावधी हा तीन महिन्याचा असून या कामाला कंत्राटदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे.परंतु सदर काम हे अत्यंत संथगतीने सुरू असून नुकतीच पावसाळ्याला सुरवात झालेली असल्याने आणि शेतकऱ्याचे खरीप हंगाम अवघे काही दिवसच राहीले असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्याला अंधारामधून दूर करणाऱ्या रेणुकापूर ते नांदगाव खंडेश्वर 33 के व्ही विद्युत वहिनीचे काम हे अत्यंत थंड बसत्यात सुरू आहे त्यामुळे खरीप हंगामात शेतकरी वर्गाच्या उपयोगाकरिता विद्युत लाईन ही त्यांना शेतीकरिता मिळते की नाही ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्याच्या शेतीची कामे सुरू होणार आहेत आणि येन पावसाळ्यात हे काम करणारे कंत्राटदार शेतकऱ्यांच्या शेतात पोल उभे करणार काय ? आणि त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान होणार नाही काय ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे
याकडे विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांचे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे जणूकाही हे अधिकारी निद्राअवस्थेत आहे की काय ? हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे. याकडे लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा जातीने लक्ष देऊन हे काम लवकरात लवकर आणि काम दर्जेदार होण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्देश सबधित विभागाला द्यावेत अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
Comments