नांदगाव खंडेश्वर येथे श्री संत भिमा भोई जयंती सोहळा संपन्न.

विदर्भ भोई समाज सेवा संघ तालुका कमेटी च्या वतिने आयोजन.


उत्तम ब्राम्हणवाडे.

 विदर्भ भोई समाज सेवा संघ तालुका कमेटीच्या वतिने श्री संत भिमा भोई जयंती सोहळा व समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार सोहळा नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वर मंदिर संस्थान येथे संपन्न झाला. वर्षानुवर्षे पासून भोई समाज हा मासेमारी साठी भटकंती करत उदरनिर्वाह चालविणारा समाज आहे. अजूनही भोई समाजामधून राजकीय, सामाजिक अस्तित्व निर्माण झाले नसून त्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन प्रतिनिधित्व तयार करण्याच्या गरजेतून व समाजातील लोकांमध्ये समाजप्रबोधन उद्देशाने संत भिमा भोई जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री संत, कवि, तत्त्वज्ञानी, समाजसुधारक भिमा भोई ( 1850-1895) यांनी सत्य महिमा धर्माची स्थापना करून मानवता व जगाचे कल्याण यासाठी आपले सर्वस्व आयुष्य खर्ची घातले. समाजबांधवांनी सुद्धा आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व हक्क मिळविण्यासाठी हाच दृष्टिकोन ठेवून अस्तित्व जपण्याची गरज आहे. यावेळी भटक्या जमातीचे (NT) कैवारी माजी खासदार स्व. जतिराम बर्वे यांच्या जीवनकार्यावरही प्रकाश टाकण्यात आला. जतिराम बर्वे यांच्या प्रयत्नामुळे NT प्रवर्ग अस्तित्वात आला आणि काही अंशी सर्व भटक्या जमातींना आरक्षणाचा फायदा मिळू लागला. म्हणून आता सुद्धा अनेक साऱ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राजकीय नेतृत्व तयार होण्याची गरज असल्याचे कार्यक्रमातून विषद करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्तुजी सोनोने यांनी भुषविले.‌ उद्घाटक सुधाकरराव नांदने यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा चांगला अनुभव आहे अशा प्रामाणिक व्यक्तिला मोठे करणे, नेतृत्व तयार करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. विदर्भ भोई समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक गणेशराव अवझाडे यांनी आपल्या विस्तृत मार्गदर्शनात संत भिमा भोई, जतिराम बर्वे यांच्या विचार कार्याचा आढावा घेतला. आज जर आपण एकत्रित येऊन मुद्देसूद मागण्यांसाठी राजकीय नेतृत्व तयार केले नाही तर समाज पिछाडिवरच राहणार. आपल्या मुलामुलींना शिकविण्यासाठी व सुपिक डोकं तयार होण्यासाठी सद्या मंदिराची नसून वाचनालयाची गरज असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते महादेवराव गारपवार यांनी ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे समाजबांधवांना मार्गदर्शन केले व आवश्यक गोष्टिंचा उलगडा केला. यशोधन बावणे यांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात प्रतिनिधीत्व तयार होण्याचे मत व्यक्त केले. श्रीकृष्ण मारबते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. NT चे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले मनोज गावनेर यांनी कार्यक्रमाचे सुत्र सांभाळत मागण्या सारख्या असल्याने हक्क मिळविण्यासाठी इतर शोषित मागास भटक्या जमातीमधील समाजाला सुद्धा सोबत घेऊन चालण्याची वृत्तीने काम करण्याची गरज बोलून दाखविली. यावेळी सुधाकरराव नांदणे, दत्तुजी सोनोने, गणेशराव अवझाडे, संभाजी कावनपुरे, महादेवराव गारपवार, प्रा. यशोधन बावणे, श्रीकृष्ण मारबते, बापुरावजी सोनोने, प्रदिप ओंकार मोरे, विजय मारबते, मानिक सोनोने, प्रशांत ढाले, सुभाषराव कोल्हे, गजानन सोनोने, मारोतराव सोनोने, अरूण बुरे,मनोज गावनेर, दिलिप शापामोहन उपस्थित होते.
   विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्त्वांचा यावेळी सत्कार करण्यात. ज्यामध्ये सहा. अभियंता विजय अळणे, सॉफ्टवेअर इंजिनिअर यश सोनोने, समुपदेशन अधिकारी (CHO) वैशाली बावणे, ग्रा.पं. सदस्य विभाताई मेश्राम व पांडुरंग मारबते, समाजसेविका सुधाताई सोनोने, महिला मत्स्य व्यवसायिक शकुंतलाताई केवदे, राहुल सोनोने, संतोष उके यांचा सत्कार करण्यात आला.
  कार्यक्रमाचे आयोजक अक्षय कोल्हे, अतुल सोनोने, वैभव बावणे, सागर भामुद्रे, दिनेश कुकडे, सुनिल बावणे, रुपेश केवट, संजय बेंद्रे, प्रदिप मोरे, श्रीकृष्ण शेंडे, विष्णू शेंडे, शंकर गोंडाने, सुधिर श्रीनाथ, अनिल बुधले होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात