मंगरूळ (चव्हाळा) येथील मास्टर माईंड पुरवतो अवैध दारूच्या पेट्या.

पोलीस प्रशासनाच्या हातावर देतो तुरी.

पंधरा ते वीस गावाना करतो देशी दारूचा अवैध पुरवठा. 

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर तालुक्या अंतर्गत येत असलेल्या तसेच मंगरूळ (चव्हाळा) पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सालोड(कसबा)वेणी (गणेशपुर) कणी (मिर्झापूर,)पिंपळगाव (निपाणी) जगतपुर, गोळेगाव सह अश्या अनेक गावामध्ये अवैधरीत्या देशी विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे या गावात अवैधरीच्या दारूची विक्री करणारा मास्टर माईंड हा मंगरूळ (चव्हाळा) येथील आहे हा व्यक्ती दररोज मंगरूळ (चव्हाळा) शिवारातील 20 च्या वर गावांना देशी दारूची अवैधरीत्या विक्री करून मंगरूळ (चव्हाळा) येथील पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देतो या मास्टर माईंडचे अनेक गावांत खबरी असल्याने त्याच्यावर पोलीस प्रशासन कार्यवाही करीत नाहीत पोलीस कारवाई पूर्वीच हा व्यक्ती फरार होतो आणि पोलिसांच्या नाकावर टिचुन त्याची खुलेआमपणे अवैध दारूची विक्री मोठया प्रमाणात सुरू आहे.मंगरूळ (चव्हाळा) येथील सहा वर्षांपासून बंद असलेली अवैध देशी दारू विक्री पुन्हा सुरू झाली आहे त्यामुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहे पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी व गावातील पोलीस प्रशासन यांनी या अवैध धंदे विक्री करणाऱ्या मास्टर माईंडवर लवकरात लवकर कडक कार्यवाही करावी अन्यथा गावातील महिलां याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडून पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे गावातील महिलांनी सांगितले आहे. याकडे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात