अंजनगाव बारी सेंट्रल बँक आँफ इंडिया शाखेत ग्राहकांना तक्रारीत वाढ.
अंजनगाव बारी सेंट्रल बँक आँफ इंडिया शाखेत ग्राहकांना तक्रारीत वाढ.
उत्तम ब्राम्हणवाडे.
येथील सेंट्रल बँक आँफ इंडिया शाखेत दिवसेंदिवस ग्राहकांना तक्रारीमध्ये वाढ होत असुन ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यात गेल्या सहा महिन्यांत या बँकेत तिनदा वेगवेगळ्या नव्या कर्मचाऱ्यांचा भरणा होतो आणि लगेच बदली सत्र सुरु होते त्यामुळे ग्राहकांना सुरळीत सेवांना मुकावे लागते त्यात बँकेत गेल्या एका वर्षापासून सहाय्यक प्रबंधक व शिपाई ही पद रिक्त असल्याने ग्राहकांना अत्यावश्यक सेवांना मुकावे लागल्याच्या तक्रारी वारंवार ऐकायला येत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे शासनाच्या ग्रामीण विभागातील बँकिंग सेवेकडे दुर्लक्ष असल्याचे जाणवत असुन आर्थिक व्यवहाराच्या महत्वाच्या अशा क्षेत्राकडे असलेला मागासलेपणा दिसून येत आहे.
अंजनगाव बारी येथील लोकसंख्या पाहता व आजूबाजूच्या १० गावातील नागरिक या छोट्याशा बँकेशी असलेले व्यवहार पाहता बँकेचा व्यवहार चोख असायला हवा त्यातच काही दिवसापासून बदललेले नवे कर्मचारी यांना ग्राहकांशी जुळवून घेतांना अनेक अडचणी येत आहे. त्यामध्ये खाते बंद पडणे,शेतकऱ्यांना कर्जासंबंध व्यवहार रखडणे,नव्या खाते काढतानीच्या अडचणी ,ए.टी.एम.सेवांमधील समस्या या व इतर क्षेत्राशी संबंधित छोट्या- मोठ्या समस्याना दररोज सामोरे जावे लागत आहे. त्यात वृद्ध पेंशन व निराधार, बचट गटांना काही अडचणी जात असल्याचे नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे.
अशा अनेक अडचणींच्या बँक समोरे जात असुन वरिष्ठ अधिकारी व स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामध्ये सर्वप्रथम येथील कर्मचारी रिक्त पदे कायमस्वरूपी भरुन नियमित रुजू करावे व नागरिकांना योग्य सुविधा मिळावी यासाठी शाखा प्रबंधकाने वरिष्ठांचा सल्ला घेऊन बँक शाखेला नवी उभारणी देण्यासाठी तत्पर राहण्याची गरज असुन यासाठी नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. असे तज्ञांचे म्हणणे आहे.
Comments