बेग नाल्यावरील अतिक्रमित दुकानासमोर न.प. प्रशासन शरण.

50 वर्षानंतर बेग नाल्याच्या बांधकामाला सुरुवात अतिक्रमित दुकानदाराची मुजोरी.

 उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर शहराला चांदूर रोडला लागून असलेल्या 2 कि. मी नाल्याचे बांधकामास गेल्या दोन महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली. पण बेग नाल्यावर उर्दू शाळा, झोंबाडी पुरा, मागील भिंतीला लागून अतिक्रमण संबंधित दुकानदाराने केलेले आहे. संबंधित अतिक्रमण धारक बेग नाल्याच्या बांधकामास अडथळा निर्माण करीत असून मुजोरी करीत आहे. बेग नाल्याच्या बांधकाम ठेकेदारांनी अतिक्रमित दुकानासमोर नाला वळवून बांधकाम केलेले दिसत आहे. संबंधित ठेकेदार व संबंधित अतिक्रमित व्यक्ती चिरी, मिरीचा व्यवहार झाल्याची नागरिकात चर्चा आहे.
 बेगनाला वळविल्याने पावसाळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे पाण्याला थोप बसून बेगनाल्या लगतच्या झोंबाडी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरण्याची दाट शक्यता आहे. बेग नाल्याचे बांधकाम सुरू झाले तेव्हापासून सांडपाण्याने नाल्या तुडुंब भरलेले आहेत. संबंधित अतिक्रमण धारकाला न. प.प्रशासनाने नोटीसा बजावून सुद्धा अतिक्रमण का काढले नाही. हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यामुळे असे लक्षात येते की, नगरपंचायत प्रशासन अतिक्रमण धारकसमोर शरण आलेले आहे. शासकीय काम सुरू असताना कामामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही. संबंधित अतिक्रमित दुकानदाराला कुणाचा राजकीय पाठबळ आहे ? हा प्रश्न नागरिकांना पडत आहेत
,..................................................................
 वेगनाला बांधकाम करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असली तरी अतिक्रमण काढण्यासंदर्भात न. प.प्रशासनाला लेखी सूचना दिल्या आहेत आता अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही नगर पंचायत प्रशासनाची आहे.
- प्रशांत आवनकर
  उपकार्यकारी अभियंता.
 पाटबंधारे विभाग ना. खं.
..................................................................
मी दोन-तीन दिवसांमध्ये नांदगाव खंडेश्वर येथे आल्यानंतर बघतो व कारवाई करतो.याबाबत मी अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती मागितलेली आहे.
- विजय लोहकरे
प्रभारी मुख्याधिकारी, नगर पंचायत
नांदगाव खंडेश्वर.

Comments

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !