अंजनगाव बारी,मालखेड,पोहरा बंदी वनपरिक्षेत्र जैवविविधतेचे वाढते प्रमाण.

अंजनगाव बारी,मालखेड,पोहरा बंदी वनपरिक्षेत्र जैवविविधतेचे वाढते प्रमाण.


उत्तम ब्राम्हणवाडे.


परिसरातील अंजनगाव बारी,मालखेड,पोहरा बंदी जंगल अमरावती तालुक्यातील वनपरिक्षेत्रापैकी एक आहे. जैवविविधतेने नटलेला हा अद्वितीय परिसर आहे.
            अंजनगाव बारी ते मालखेड, कोंडेश्वर ते पोहरा बंदी मार्गावर हे जंगल विस्तारलेले आहे. वडाळी,पोहरा,मालखेड,चिरोडी,कोंडेश्वर,हातला असे राखीव जंगल जवळपास १६० कि.मी.एवढे आहे.वन्यप्राण्याच्या उपलब्धतेमुळे ब्रिटिश काळात अंजनगाव बारी,मालखेड, पोहराबंदी,वडाळी जंगलाचा भाग शिकारीसाठी राखून ठेवला होता.या जंगलांना अभयारण्याचा दर्जा मिळावा यासाठी २५ वर्षापासून वन्यप्रेमी प्रयत्न करीत आहे.मेळघाटात असतील ते सर्व प्राणी या जंगलात आढळतात वाघदेखील या जंगलक्षेत्रात अधूनमधून पाहावयास मिळतो.तो वर्ष दोन वर्षे येथे मुक्काम करतो हे यापूर्वी सिद्ध झाले आहे.बिबट्याची संख्या या ठिकाणी २० च्या जवळपास आहे.लांडगे,कोल्हे,तडस,हरिण,चितळ,काळवीट असे सस्तन प्राणी येथे आढळून येतात.ठिकठिकाणी पाणवठे, तालाव,बंधारे आहेत.
             वनस्पतीच्या २०० पेक्षा जास्त प्रजाती आणि स्थानिक व स्तलांतरित असे मिळून २९० पक्षी प्रजाती आहेत.सापाच्या १८ प्रजाती,१० प्रकारचे सरपटणारे प्राणी,माशाच्या १८ आणि फुलपाखरांच्या ७५ प्रजाती आहेत.जंगलातील पाण्यावर ब्रिटिश काळात भिवापूर तलाव,सावंगा तलाव, आडगाव तलाव,छत्री तलाव,वडाळी तलाव असे ५ तलाव बांधण्यात आले.
            कोरोणामुळे जंगलातील. मानवी हस्तक्षेप थांबला होता.त्यामुळे वन्यप्राणी-पक्षी,झाडांना मोकळा श्वास घेता आला.
            अंजनगाव बारी,मालखेड, पोहरा राखीव जंगल हे मेळघाटानंतर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.तब्बल २१० पक्षीप्रजातींची नोंद येथे झाली आहे.या जंगलाना अभयारण्य घोषित करावे या मागणीसाठी गेल्या २५ वर्षापासून पाठपुरावा होत आहे.गावे शेतीसंदर्भात प्रशासकीय अडचणी येत असल्या तरी दोन्ही बाजूचा समतोल साधावा लागेल.तेव्हाच येथील जैवविविधतेचे संवर्धन करता येईल, असे बोलल्या जात आहे.अमरावती तालुक्यातील अंजनगाव बारी,मालखेड, पोहरा तसेच इतर भागात पक्षी,वनस्पती, साप,सस्तन प्राणी,फुलपाखरे, औषधी,पिक वाण अशा एकूण १८२२ जैवविविधता असल्याची नोंद आहे.यामध्ये मेळघाट सर्वाधिक असुन अंजनगाव बारी,मालखेड,पोहरा बंदी तसेच इतर काही भागात जैवविविधता आहे.वनस्पतीच्या १००८ प्रजाती असुन पक्षी ३९४,साप ३२,सस्तन प्राणी ३७,फुलपाखरे १३०,औषधी वनस्पती १५०,पीक वाणाच्या ६० प्रजातींची नोंद आहे.यापैकी बऱ्याच प्रमाणात प्रजातींची संख्या अंजनगाव बारी परिसरात निदर्शनास येत आहे.
              अंजनगाव बारी परिसरातील मालखेड, पोहरा बंदी,कोंडेश्वर,भानखेड,हातला इ.भागातील जंगलाना अभयारण्याचा दर्जा देऊन तटबंदीची योजना करणे आता क्रमप्राप्त झाले आहे.ज्यामुळे प्राण्यांचे संवर्धन साधल्या जाईल व बळीराजाला यापासून मोलाची सुविधा होईल यात शेतकरी व प्राण्यांच्या संवर्धनाचा समतोल साधेल यात शंका नाही.

 "वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून शेताच्या तार कंपाऊंड साठी अर्ज मागविले होते.मात्र ते ७ वर्षांपासून धुळखात पडले आहे.शासनाने वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून,शासनाने ही योजना वनविभागामार्फत राबविण्यात येत होती.मात्र ताराचे कुंपण झाले नसल्याने शेतकरी प्रतीक्षा करीत आहे."
          -- श्रीराम पिसे,शेतकरी, पार्डी( देवी)

"केंद्रशासनाने अभयारण्य व्हावे म्हणून पोहरा बंदी ते अंजनगाव बारी परिसर १९८५ साली मंजूरात दिली होती.तेव्हा पासून ते काम थंडबस्त्यात पडून आहे.वन्यप्राणी व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी हे अभयारण्य होणार होते.तब्बल ३८ वर्षे उलटूनही अभयारण्य झाले नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहे."
            -- शंकर पवार, शेतकरी, अंजनगाव बारी.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात