पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे योजना कार्यशाळा संपन्न.

पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे योजना कार्यशाळा संपन्न. 

उत्तम ब्राम्हणवाडे.

  शिक्षण विभाग योजना व शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक अमरावती अंतर्गत पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे तालुकास्तरीय योजना कार्यशाळेचे आयोजन तहसील सभागृह तहसील कार्यालय नांदगाव येथे करण्यात आले. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक तथा शिक्षणाधिकारी योजना माननीय सैय्यद राजीक सर यांनी विद्यार्थी लाभाच्या योजना, त्याचे निकष,
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नोंदणी करताना घ्यावयाची खबरदारी या संदर्भात मार्गदर्शन केले. माननीय श्री अभिजीत उमककार साहेब यांनी शिष्यवृत्ती संदर्भात येणाऱ्या त्रुटी बाबत मार्गदर्शन केले तसेच पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शेख अल्ताफ सर यांनी आपल्या प्रास्तविकेमधून सदरचे शिष्यवृत्ती बाबतचे फलक दर्शनी भागावर लावण्या संदर्भात सूचना दिल्यात. सदर कार्या.शाळेचे आभार प्रदर्शन पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ प्रमिलाताई शेंडे यांनी केले. तर सूत्रसंचालन कुमारी वैशाली दहीकर विषय साधन व्यक्ती यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गट सदन कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्व केंद्रप्रमुख व सर्व व्यवस्थापन शाळांचे मुख्याध्यापक व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात