माऊली चोर ते जसापुर रस्ता वन्याप्राण्यां मुळे घातक.
नागरिकांच्या जीवितास धोका.
वनाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खडेश्वर तालुक्यातील अमरावती यवतमाळ महामार्गावरील माऊली चोर ते जसापुर या भागामध्ये वन विभाग मोठ्या प्रमाणात आहे व तेथे बाभुळीचे झाडे दाट असून त्यामध्ये वन्य प्राणी रोही, डुकरे ,हरीण, माकड, वास्तव्य करतात व त्या जंगलाला लागून अमरावती ते यवतमाळ मार्ग जातो अशावेळी दुपारचे पाच वाजता पासून तर ते सकाळी दहा वाजेपर्यंत हे प्राणी इकडून तिकडून ये जा करीत असतात आणि ह्यामुळे लाईटच्या प्रकाशामध्ये वाहन चालविणाऱ्यांना काही दिसत नाही अशावेळी बऱ्याच प्रमाणात अपघात झालेले आहेत या अपघातामध्ये बरेच लोकांची जीवित हानी झाली ह्यामध्येच अलीकडेच माऊली चोर गावातीलच गावाशेजारी मोठ्या प्रमाणात रोही यांचा कळप आल्यामुळे दुचाकीवरून दोघेही पडले आणि ह्यामध्ये मंगेश आळसपुरे यास गंभीर दुखापत झाल्यामुळे तो रेडियंटमध्ये उपचार घेत आहे व शुभम ओलीवकर हा सावदेकर यांच्या दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे अशामुळे त्यांच्या संसाराची परिस्थिती मुलाबाळांचे पत्नीचे काय होणार ह्या संदर्भात ग्रामपंचायत माहुली चोर नी दिनांक 19/ 5 /2023 चा विषय क्रमांक 22 चा ठराव संबंधित जिल्ह्याच्या व वनपरिक्षेत्र वडाळी यांच्याकरता ठराव देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये जसापुर बीट ते माऊली चोर गाव इथपर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला मजबूत असे अँगल पाईप तार जाळी ह्याच कंपाउंड घ्यावे म्हणजे ते वन्य प्राणी त्या भागातून या भागाकडे किंवा त्या भागाकडे ये जा करणार नाही अशामुळे वाहाना वरुन ये जा करणाऱ्यांचे प्राण वाचेल व त्यांचे मुलं बाळ पत्नी उघड्यावर पडणार नाही आणि पैशाचा अपव्यय होणार नाही तेव्हा ह्याबाबत संबंधित वन विभागाचे अधिकारी संबंधित राज्य सरकारचे वन विभागाचे मंत्री महोदय यांनी यासंदर्भात दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Comments