चांदी प्रकल्पावर उन्हाळा संपूनही एक्सप्रेस फिडरच्या कामाला सुरुवातच नाही.
ठेकेदार पावसाळ्यात कामाला सुरुवात करणार काय.?
शहरात पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती.
माजी नगरसेवक फिरोज खान यांचा आरोप.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर शहराकरिता पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नजीकच्या चांदी प्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु विद्युतदाब हा व्यवस्थित नसल्याने शहराला सध्याच्या परिस्थितीत आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येतो. याकरिता चांदी प्रकल्पावर एक्सप्रेस फिडर उभारण्यासाठी शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यासाठीचे सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यात आले असून या कामाची निविदा अमरावती येथील एस.जी. इंजिनियरींग यांना मिळाली आहे या कामाची त्यांना वर्कऑर्डर नगर पंचायतीच्या वतीने देण्यात आलेली असून चांदी प्रकल्पावर पापड येथील विद्युत सबस्टेशन वरून विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. ही 12 kv लाईन असून कामसुद्धा मोठे आहे.हे काम उन्हाळ्यातच होणे अपेक्षित असतानाही या कामाला कंत्राटदाराकडून अद्यापही सुरुवात न झाल्याने कामाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात हे काम होणे शक्य नाही कारण शेतकऱ्याच्या शेतात पेरणीचे कामे सुरू होईल आणि विद्युत वाहिनीच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल परंतु याच्याशी संबंधित कंत्राटदारांना काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे ? त्यामुळे नांदगाव खंडेश्वर शहरवासियामध्ये तीव्र संताप दिसून येत असून पावसाळ्यातही जर हे काम सुरू झाले नाही तर हे काम आठ महिन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खरे ? कामाची वर्क ऑर्डर मिळूनही संबंधित कामाच्या सुरू करण्यास होणाऱ्या विलंबाच्या मागे काय षडयंत्र असेल हे सांगता येत नाही. सदर काम लवकरात लवकर सुरू केल्यास या विरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा नगरपंचायतचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती फिरोज खान यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.
...........................................
...........................................
एक्सप्रेस फिडरच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून सदर कामाचा कालावधी चार महिन्यांचा आहे हे काम एस.जी.डी.कंपनीला देण्यात आलेले आहे.नांदगाव शहराला सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. हे काम आम्ही टॉप प्रायोरिटीवर करीत असून यावर आमचे लक्ष आहे.
- अभिजित लोखंडे
नगर अभियंता,पाणी पुरवठा विभाग,नगर पंचायत.
.........................................
सदर कामाला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही मी स्वतः या कामाच्या ठिकाणी जाऊन आलो आहे त्यामुळे अधिकारी हे कामाच्या बाबतीत उडवा उडवीची उत्तरे देत आहे भर उन्हाळ्यात शहराला सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा सुरू आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकाचा अंत पाहू नये.या कामाला लवकर सुरुवात न केल्यास आपण तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
- फिरोज खान
Comments